जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्या अगोदर भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुटी दिली होती. आता या सुटीचा कालावधी संपलेला असून भारतीय संघाने डरहॅममध्ये इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतसाठीची तयारी सुरू केली आहे. सराव करतानाचे फोटो भारतीय संघातील खेळाडूंनी सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत.
भारतीय संघाला कसोटी मालिकेपूर्वी 20 जुलैपासून काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरूद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळायचा आहे. त्यानंतर भारतीय संघाला 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
या मालिकेच्या तयारीसाठी पुन्हा सरावाला सुरुवात केल्यानंतर रोहित शर्माने त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की ‘चलो भाई, छुट्टी खत्म… अब काम शुरू (चला, सुटी संपली, आता कामाला सुरुवात)’. तसेच विराटने जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, केएल राहुलबरोबरचा फोटो शेअर करत म्हटले आहे की ‘परत आलो आहोत’. विराट, रोहित व्यतिरिक्त केएल राहुल, उमेश यादव, जसप्रीत बुमराह अशा अनेक खेळाडूंनी डरहॅमला सराव करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.
चलो भाई, छुट्टी खत्म… अब काम शुरू! 👊🏻🇮🇳 pic.twitter.com/qk4ovSGq3v
— Rohit Sharma (@ImRo45) July 16, 2021
Back at it 🏏🇮🇳 pic.twitter.com/HPsBXif2bm
— Virat Kohli (@imVkohli) July 16, 2021
Back with the boys 🇮🇳 pic.twitter.com/kGtUEQ4SfS
— K L Rahul (@klrahul) July 16, 2021
New day, same goal 🇮🇳 #TeamIndia pic.twitter.com/4YK9da7rNk
— Umesh Yaadav (@y_umesh) July 16, 2021
my favourite kinda start to the weekend 💪💯 pic.twitter.com/GNgWBmC9IY
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) July 16, 2021
Business hours 💼#TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/m0P61j7xEb
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 16, 2021
जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांसारखे उत्कृष्ट खेळाडू मागील काही काळापासून आपल्या फॉर्ममध्ये नाहीत. अशा परिस्थितीमध्ये डरहॅममध्ये तीन दिवसीय सराव सामन्यात सर्वांचे या खेळाडूंकडे लक्ष असेल.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत 4-1 ने पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना देखील गमावला आहे. आता हे पराभव विसरून भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरावे लागेल.
इंग्लंड दौऱ्यावर असताना भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलला दुखापत झाली असल्याने तो पहिल्या कसोटीमधून बाहेर असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये रोहित शर्मासह सलामीला कोण उतरणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा इंग्लंड दौऱ्यासाठी संघाचा हुकुमी एक्का म्हणून सिद्ध होऊ शकतो. या अगोदर जडेजाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
महत्वाचे म्हणजे भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांनी कोरोनाची लागण झालेली आहे. तसेच गरानी यांच्या संपर्कात आल्याने वृद्धिमान साहाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे पंत आणि साहा हे दोन्ही प्रमुख यष्टीरक्षक सराव सामन्यासाठी उपलब्द नसतील. त्यामुळे या सराव सामन्यांमध्ये केएल राहुल यष्टीरक्षण करताना दिसू शकतो.
हा सराव सामना डरहॅमच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. या सराव सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरुवात होणार आहे. या सराव सामन्यानंतर भारतीय संघ नॉटिंगघमला इंग्लंड विरुद्ध पहिला सामना खेळण्यासाठी रवाना होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
लुईसच्या वादळात उडाली ऑस्ट्रेलिया; टी२० मालिकेत ४-१ अशी सरशी साधत वेस्ट इंडिजने दाखवला दम
भारत-श्रीलंका येणार आमने-सामने, ‘अशी’ आहे दोन्ही संघांची वनडेतील एकमेकांविरुद्धची कामगिरी
टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याचे कळताच ‘मौका मौका’ ट्रेंड, पाहा काही खास मीम्स