सध्या न्यूझीलंड संघ भारतीय दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी२० सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) पार पडला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ७३ धावांनी विजय मिळवला. तसेच सामना झाल्यानंतर रोहित शर्माने एका गोष्टीची भीती व्यक्त केली आहे.
सामना झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, “चांगली सुरुवात करणे नेहमीच गरजेचे असते. दवामुळे चेंडू बॅटवर चांगला येत असतो. होय, मधल्या फळीत आता सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. परंतु, खालच्या फळीतील फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या मालिकेत हर्षल पटेलने उत्कृष्ट गोलंदाजी केली, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर अश्विन या तिन्ही फिरकी गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली, केएल राहुल उत्तम होता आणि व्यंकटेश अय्यर आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. हा एक चांगला संकेत आहे की, आमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत.”
विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माला टी२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तसेच नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माने पहिलीच मालिका आपल्या खिशात घातली आहे. तसेच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकाची भूमिका देण्यात आली आहे. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा या दोघांसाठी ही मालिका खास ठरली. आता या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.
तसेच तिसऱ्या टी२० सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर ईशान किशनने २९ धावांचे योगदान दिले होते. तसेच अखेरीस दीपक चाहरने ८ चेंडूत २१ धावांची तुफानी नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १८४ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या १७.२ षटकात १११ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड संघाकडून मार्टिन गप्टीलने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर टीम सेफर्टने १७ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ७३ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आमचे पाय जमिनीवरच राहू देऊ’, न्यूझीलंडविरुद्ध विजयानंतर राहुल द्रविड यांची मार्मिक प्रतिक्रिया
भावाने नादचं केलाय थेट! नियमित कर्णधार म्हणून पहिल्याच टी२० मालिकेत रोहित बनला ‘मॅन ऑफ द सिरीज’