भारतीय क्रिकेट संघासाठी वनडे प्रकारातील दोन सर्वात मोठ्या स्पर्धा आशिया चषक 2023 आणि विश्वचषक 2023 या स्पर्धा होणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून भारीतय संघाला विजेता बनण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने चांगली फलंदाजी करणे अत्यंत आवश्यक आहे.
भारतीय संघाची कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा वनडे प्रकारामध्ये मोठ्या धावांची खेळी खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याने या प्ररकारामध्ये 8 वेळा 150 हून अधिक धावांची खेळी खेळली आहे, जी वनडे इतिहासातील सर्वोच्च आहे. याशिवाय वनडे प्रकारामध्ये सर्वाधिक 264 धावांची वैयक्तिक धावसंख्याही रोहित शर्माच्या नावावर आहे, जी त्याने श्रीलंकेविरुद्ध केली होती. मात्र, गेल्या काही काळापासून त्याला मोठी खेळी खेळता आलेली नाही.
त्याने शेवटची 2019 मध्ये एकदिवसीय सामन्यात 150 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळली होती. त्यामुळे क्रिकेटच्या या प्रकारामध्ये रोहितची सरासरी थोडी कमी झाली असली तरी त्याचा स्ट्राईक रेट वाढला आहे. याबद्दल बोलताना रोहितने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे.
कर्णधार म्हणाला की, “माझी सामान्य फलंदाजी अजूनही माझी ताकद आहे, परंतु मला काहीतरी वेगळे करून पाहायचे होते आणि मी निकालाने खूप आनंदी आहे. प्रत्येकाला लांब फलंदाजी करायची असते आणि 150 आणि 170 धावा करायची असतात. मला अजूनही ते करायचे आहे, परंतु आपण न केलेले काहीतरी करणे नेहमीच छान असते. हे तुमच्या फलंदाजी क्षमतेच्या यादीत एक नवीन आयटम जोडते. जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही.”
पुढे महान फंदाज म्हणालाकी, “मला माहीत आहे की जर मी जोखमीचे शॉट्स खेळले तर मी बर्याच वेळा बाद होईल पण मला त्याची पर्वा नव्हती. मी संघ व्यवस्थापनाला सांगितले होते की मला असे खेळायचे आहे.”
रोहितने 2007 साली आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरवात केली होती. 2007 ते 2019 पर्यंत, रोहितचा वनडे स्ट्राईक फक्त एकदाच 100 च्या वर होता. 2022 मध्ये त्याने 114.22 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. आणि 2023 मध्ये त्याने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये 106.09 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. मात्र, स्ट्राइक रेट वाढवण्यासाठी त्याची सरासरी निश्चितच कमी झाली आहे. अशा परिस्थितीत रोहित आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत आपला स्ट्राइक रेट आणि सरासरी कशी सांभाळतो हे पाहणे मनोरंजक ठरेल आहे. (rohit sharma talk about his batting perfomance)
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकापूर्वी बांगलादेश संघाला मोठा झटका! महत्वाचा गोलंदाज दुखापतीमुळे ‘इतके’ महिने बाहेर
महिला क्रिकेटसाठी ईसीबीचा मोठा निर्णय! पुरुष आणि महिला खेळाडूंना एकसमान मॅच फी