भारतीय संघ हा पाकिस्तानला हरवल्यानंतर 27 ऑक्टोबरला (गुरुवार) नेदरलंडशी भिडणार आहे. भारत विरुद्ध नेदरलंड हा सामना सिडनी येथे खेलला जाईल. नेदरलॅंड्स हा संघ यूएई आणि नामिबीया संघांना पराभूत करून इथपर्यंत पोहचलाय. पण श्रीलंकेच्या हातून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तसेच दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला नमवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच ऊंचावला आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंजवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात थरारक सामना खेळला गेला. अनेकजण या सामन्याता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वात रोमांचक लढत देखील म्हणत आहेत. विराट कोहलीने या सामन्यात नाबाद 82 धावा करत नायाक म्हणून पुढे आला आहे. विराटच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने टी20 विश्वचषक 2022 मधील आपल्या पहिल्यात सामन्यात पाकिस्तानवर 4 गडी राखून मात केली. मागच्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताला 10 गडी राखून पराभूत केले होते. आता भारताने या पराभवाचा वचपा देखील काढला आहे.
पण भारताची मोहीम इथेच संपलेली नाही. उपांत्य फेरीपर्यंत पोहचण्यासाठी भारताला आपल्या गटातील दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेशसारख्या संघांना हरवावं लागणार आहे. मात्र, नेदरलंड संघाला हलक्यात घेउन चालणार नाही. 24 ऑक्टोबरला बांग्लादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात नेदरलंड फक्त 9 धावांनी हरला आहे. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चालला. आता पुढच्या सामन्यात भारताला आपला रनरेट वाढवण्याची चांगली संधी आहे. रनरेट सुधारुन भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पुन्हा विराजमान होऊ शकतो. भारताला उपांत्यफेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उरलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामने जिंकावे लागतील.
विश्वचषकात रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ त्यांचा दुसरा सामना गुरुवारी (27 ऑक्टोबर) सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे नेदरलॅंड्स विरुद्ध खेळेल. पाकिस्तान विरुद्ध मिळवलेला विजय साजरा केल्यानंतर भारतीय संघ सिडनी येथे पोहचला. भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंह याने सिडनी येथे पोहचल्यावर त्याचा फोटो शेअर केला. खेळाडूंचे सिडनीतील इतरही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
“बस झालं, आता विश्वचषक थांबवा”; ऑस्ट्रेलियन खेळाडूची धक्कादायक मागणी
‘अश्विनने माझे ऐकले नाही!’, मॅच विनिंग शॉटविषयी विराट कोहलीचा मोठा खुलासा