पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जूनपासून साऊथॅम्प्टनवर सुरू होत आहे. या सामन्यात भारताकडून डावाची सुरवात करण्याची जबाबदारी रोहित शर्मावर असेल. माजी भारतीय दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणनी या अंतिम सामन्याआधी रोहितला एक मोलाचा सल्ला दिला आहे. लक्ष्मणने सांगितले की रोहितला शर्माला डावाच्या सुरवातीला न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीपासून सावधनता बाळगण्याची आवश्यकता आहे.
लक्ष्मणच्या या सल्ल्याचे कारण म्हणजे डावा हाताच्या वेगवान गोलंदाजांसमोर रोहितची कामगिरी खराब आहे. मागच्यावेळी इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाकडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोहितला नव्या चेंडूवर संघर्ष करावा लागला होता. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने त्याला टी20 स्पर्धेत देखील हैराण केले होते. आमिरने आताच विधान केले होते की, विराट कोहलीपेक्षा रोहितला बाद करणे ही तुलनेने सोपे आहे.
लक्ष्मणने पुढे सांगितले, “नव्या चेंडूवर गोलंदाजी करणाऱ्या बोल्टचा सामना रोहितला करावा लागेल. रोहितला कल्पना आहे की बोल्टविरुद्ध त्याला डावा पाय बाहेर काढून नाही चालणार, डावाच्या सुरवातीला त्याला या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल.”
आयपीएल स्पर्धेत एकाच संघाकडून खेळतात बोल्ट आणि रोहित
बोल्ट आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्यामुळे त्याला न्यूझीलंडच्या इतर गोलंदाजांपेक्षा रोहितच्या कच्च्या बाजूंबद्दल जास्त माहिती आहे.
लक्ष्मणाला वाटते की रोहितला यावेळी त्याच्या ऑफ स्टंपवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यानी सांगितले की, “माझ्या मते फक्त रोहितच नाही तर सगळ्या सलामी फलंदाजांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे की आपला ऑफ स्टंप कुठे आहे. जेव्हा पासून रोहित सलामीला फलंदाजीला यायला लागला आहे, तेव्हापासून तो तो या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देतो की त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे.”
लक्ष्मणने पुढे सांगितले, “हेच गांभीर्य रोहितने आतादेखील दाखवले पाहिजे जेणेकरुन तो चांगली कामगिरी करेल. आपल्या सर्वांना माहितीये की तो एक शानदार फलंदाज असून भारतीय संघाचं प्रमुख शिलेदार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलसाठी कशी असायला हवी भारताची फलंदाजी क्रमवारी? व्हीव्हीएस लक्ष्मणने दिले ‘हे’ उत्तर
WTC फायनलमध्ये ‘मोठे’ विक्रम करण्याची विराट कोहली, रोहित शर्माला सुवर्णसंधी