नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि श्रीलंकेच्या (IND VS SL) दूसऱ्या कसोटीत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) उत्तम कामगिरी केली आहे. त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने मोहाली कसोटीत ९६ धावा केल्या, तर दुसऱ्या कसोटीत अर्धशतक लगावले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिका २-० ने जिंकली. यानंतर भारतीय कर्णधाराने रिषभ पंतचे (Rishabh Pant) कौतुक केले आहे. तो म्हणाला आहे की, पंतकडे सामन्याचे चित्र काही क्षणात बदलण्याची क्षमता आहे.
रिषभ पंत आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने कित्येकदा आपली विकेट सहजच गमावत असतो, परंतु रोहित म्हणाला की, “काही क्षणामध्ये सामन्याचे चित्र बदलवण्याच्या त्याच्या स्वाभाविक शैलीचा आम्ही स्वीकार करण्यास तयार आहोत.” रोहित म्हणाला की, “रिषभला परिस्थिती आणि खेळपट्टीनुसार फलंदाजी करण्यास सांगितले आहे.”
रोहित दुसऱ्या कसोटीनंतरच्या पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला की, “आम्हाला माहित आहे की, रिषभ कशी फलंदाजी करतो आणि एक संघ म्हणून आम्हाला त्याला स्वाभाविक खेळ दाखवण्याचे स्वातंत्र्य द्यायचे आहे. त्याला सांगितले आहे की, सामन्याची स्थिती आणि खेळपट्टी सुद्धा ध्यानात घ्यावी लागेल. तो आता उत्तम खेळत पुढे चालला आहे. कधी कधी असे सुद्धा होते की, तुम्ही म्हणता त्याने असा शाॅट का खेळला? परंतु आपल्याला त्याला त्याच पद्धतीने स्वीकारावे लागेल जसा तो खेळतो.”
तो पुढे म्हणाला, “पंत हा असा खेळाडू आहे, जो अर्ध्या तासात किंवा ४० मिनिटांत सामन्याचे रूप बदलवून टाकतो. तो यष्टीरक्षक म्हणून सुद्धा उत्तम आहे आणि प्रत्येक सामन्यात त्याची कामगिरी सुधारत चालली आहे. डीआरएस घेण्याचे त्याचे निर्णय सुद्धा यशस्वी होत आहेत.”
कसोटी कर्णधारपदाबाबत बोलताना तो म्हणाला, “संघात काही वरिष्ठ खेळाडू आहेत, जे खेळ चांगल्या प्रकारे समजतात आणि आपले मत मांडत असतात. माझी स्वत:ची समज आहे. कर्णधारपदाबाबात माझे मत असे आहे की, त्यावेळी जो निर्णय योग्य वाटतोय, तोच निर्णय घ्यायला हवा. मी मैदानात परिस्थिती जाणून घेतो. सध्या भारतीय संघाचे लक्ष्य जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याकडे आहे.”
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने मोहालीमध्ये खेळलेली पहिली कसोटी २२२ धावा आणि १ डावाने जिंकली, तर दुसरी कसोटी २३८ धावांनी जिंकली. रिषभ पंतने पहिल्या कसोटीत ९६ धावा केल्या, तर दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात अनुक्रमे ३९ आणि ५० अशा मिळून ८९ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेट @१४५! इंग्लंडने खेळले हजारहून अधिक सामने, तर ‘अशी’ राहिली भारताची कामगिरी
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बांग्लादेश संघ आला होता काळाच्या तोंडून बाहेर