भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह हे जोडपं नेहमी चर्चेत असतं. रोहित जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा रितिकाची नजर देखील त्याच्या खेळावरच असते. यावेळी अनेकदा ती खूप चिंतित देखील दिसून आली आहे. तर जेव्हा रोहित उत्कृष्ट फलंदाजी करतो तेव्हा ती आनंद साजरा करतानाही दिसते. पण या दोघांची प्रमकथा कशी सुरु झाली हे माहित आहे का? त्याचबद्दल जाणून घेऊ.
रोहित आणि रितिकाच्या एकत्र येण्याचे किस्से ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पहिली भेट त्यानंतर प्रेम आणि मग त्यानंतर लग्न हे एखाद्या रोमांचक कथेसारखेच आहे. पत्नी रितिकावर कसे प्रेम झाले त्यानंतर त्या दोघांचे लग्न कसे झाले या सर्व गोष्टींचा खुलासा रोहित शर्माने एका मुलाखतीदरम्यान केला. रोहित आणि रितिका खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतात. रोहितने सांगितले की, रितिका त्याला नेहमी साथ देते. परंतु त्यांच्या भेटीची गोष्ट खूप वेगळी आहे.
तीन वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या समोर येतो आहे. ज्यामध्ये गौरव कपूरचा कार्यक्रम ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’मध्ये रोहित शर्मा सहभागी झाला होता. यादरम्यानच रोहितने रितिका सोबतच्या पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला. रोहित पुढे म्हणाला की, ‘चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रसंगात रितिका नेहमी माझ्यासोबत असते. रितिका आणि रोहित एक चांगले मित्र देखील आहेत.’
रोहितला दिली होती धमकी
रोहितने सांगितले की, रितिका सोबतच्या पहिल्या भेटीमध्ये त्याला भारतीय दिग्गज खेळाडू युवराज सिंगने रितिका पासून लांब राहण्यासाठी सांगितले होते. खरंतर रितिका ही युवराजची मानलेली बहीण आहे. जेव्हा रोहित आणि रितिकाची पहिली भेट झाली तेव्हा युवराज आणि इरफान पठाण त्यांचे चित्रीकरण चालू होते.
युवराज सिंग हा रोहितचा वरिष्ठ खेळाडू होता. याच नात्याने रोहित युवराज सिंगला भेटायला गेला होता. परंतु रोहितचे देखील चित्रीकरण होणार होते. त्याचबरोबरच रोहितची नजर रितिकावर पडली, तेव्हा युवराज त्याला म्हणला की, ‘तिच्याकडे बघू नकोस ती माझी बहीण आहे.’
यावर रोहितने युवराजला म्हटले की,” काय भाऊ, मी तर तुम्हाला भेटायला आलो होतो.” त्यानंतर रोहित रितिकाला बघून असा विचार करत होता की, ही खूप घमंडी मुलगी असावी. परंतु चित्रीकरण झाल्यानंतर रितिका रोहित जवळ येऊन म्हणाली की, “काही अडचण असेल तर मला सांगू शकतोस.” त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि 2015 मध्ये रोहित आणि रितिकाने लग्न केले. त्यांना सध्या अडीच वर्षांची ‘समायरा’ नावाची मुलगी देखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी केला विवियन रिचर्ड्स यांच्याबरोबरच्या प्रेमकथेचा खराखुरा उलगडा
फिनिक्स भरारी! पहिल्या डावात केवळ १५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या संघाने तब्बल १५५ धावांनी मिळवला विजय