भारतीय क्रिकेट संघ येत्या काळात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी म्हणजे वैयक्तिक कारणांमुळे कर्णधार रोहित शर्मा पहिल्या काही सामन्यांसाठी अनुपलब्ध असू शकतो. अशा परिस्थितीत टीम इंडियाला एका अननुभवी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने बीसीसीआयला याबाबत माहिती दिली आहे. मात्र, रोहित शर्माची ही वैयक्तिक बाब मालिका सुरू होण्यापूर्वी सोडवली गेली. तर तो मालकेच्या सुरुवातीपासूनच संघासोबत दिसणार असल्याची माहितीही समोर येत आहे. पण रोहित शर्मा अनुपलब्ध राहिला तर त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
तर आपण या बातमीद्वारे त्या तीन खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात जे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतात.
जसप्रीत बुमराह- जसप्रीत बुमराह दीर्घ काळापासून भारतीय नेतृत्व गटाचा भाग आहे. तो संघाचा वरिष्ठ खेळाडूही आहे. बुमराहला कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्याचे नेतृत्व करण्याचाही अनुभव आहे. रोहित शर्मा अनुपलब्ध असताना त्याने इंग्लंडविरुद्धच्या पुनर्निर्धारित सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला पुन्हा एकदा कर्णधारपदाची संधी मिळू शकते. सध्या तो या शर्यतीत आघाडीवर आहे. रोहितच्या गैरहजेरीत बुमराहच्या वर दुसऱ्या कोणाची निवड झाली तर तो आश्चर्यकारक निर्णय असेल.
शुबमन गिल- शुबमन गिलचे नाव बीसीसीआयच्या निवडक खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे. ज्याला बोर्ड भावी कर्णधारासाठी तयार करत आहे. गिलची नुकतीच श्रीलंका दौऱ्यावर टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली. दुलीप ट्रॉफीमध्येही तो संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. 25 वर्षीय गिल हा कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदासाठी एक उत्तम पर्याय आहे.
रिषभ पंत- कार अपघातापूर्वी रिषभ पंतकडे भारताचा पुढील कसोटी कर्णधार म्हणून पाहिले जात होते. 21 महिन्यांनंतर रेड-बॉल क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना या 27 वर्षीय खेळाडूने आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि त्याला नेतृत्व गटात परत आणण्याच्या चर्चा लवकरच पुन्हा सुरू होतील. पंतने यापूर्वी टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर सध्याच्या संघातील कोणाला कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे कर्णधारपदाचा सर्वाधिक अनुभव असेल तर तो केएल राहुल आहे. राहुलने 2022 मध्ये जोहान्सबर्ग आणि बांग्लादेश येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र दुखापतीमुळे राहुलला सर्व फॉरमॅटमध्ये उपकर्णधारपद गमवावे लागले आहे. संघातील त्याच्या स्थानावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आगरकरसाठी राहुलची निवड करणे आश्चर्यकारक असेल.
हेही वाचा-
कसोटीत भारतासाठी एका सामन्यात सर्वाधिक 10 विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज
मोठी बातमी! बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो ‘हिटमॅन’; कारण जाणून घ्या
भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न, सूर्यकुमार यादवनं घेतला मोठा निर्णय!