---Advertisement---

हे भारीय! रोहितच्या बुटांवर असं नक्की काय लिहीलं होतं, ज्यामुळे पीटरसनही झाला खुश

On: शनिवार, एप्रिल 10, 2021 5:12 PM
---Advertisement---

शुक्रवारी(९ एप्रिल) आयपीएल २०२१ हंगामामधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्याच्या वेळी दोन्ही संघांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली. तसेच या सामन्यावेळी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने एका वेगळ्याच गोष्टीमुळे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने एक शिंगी गेंड्याचे चित्र असलेले शूज घातले होते.

त्याने हे शुज गेंड्यांची ही प्रजाती कमी होत असल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने त्याने ते शूज घातले होते. त्याच्या शुजवरवर ‘गेंड्यांना वाचवा’ सेव्ह द रायनो असा संदेशही लिहिण्यात आला होता. रोहितने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे.

रोहितने याबद्दल ट्विटमध्ये लिहिले की, ‘शुक्रवारचा सामना हा खेळापेक्षा माझ्यासाठी अधिक होता. क्रिकेट खेळणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते आणि जगातील काही गोष्टींचे जतन करणे माझे कर्तव्य, जे की आपण सर्वानी मिळून करायला हवे आहे. हे माझ्यासाठी खास होते कारण की मैदानावर जतन करणारी वस्तू हृदयाच्या जवळ असावी आणि मी त्या गोष्टीवर प्रेम करेल. मी त्या वेळी टाकलेले प्रत्येक पाऊल महत्वाचे होते.’

 

रोहितच्या शूजला पाहून इंग्लंजचा दिग्गज केविन पीटरसनही भलताच खुश झाला. कारण तो प्राण्यांवर खूप प्रेम करतो आणि बऱ्याचदा गेड्यांना वाचवण्यासाठी त्याने स्वत पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे.

https://twitter.com/KP24/status/1380777612897873920?s=20

बेंगलोरने जिंकला सामना
आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यांत मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर १५९ धावा केल्या होत्या. या डावात मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्माने १९ तर ख्रिस लिनने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या. यासोबतच ईशान किशनने २८ धावा केल्या. बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोरने १६० धावांचे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत हा सामना जिंकला. बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तसेच ग्लेन मॅक्सवेलने ३९ आणि विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---