भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 427(14 महिने) दिवसानंतर आपला पहिला टी-20 सामना गुरुवारी (11 जानेवारी) खेळला. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. यापुर्वी रोहित 10 नोव्हेंबर 2022 ला आपला शेवटचा टी-20 सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर रोहित पुनरागमन करत आहे म्हटल्यावर सर्वांनाच मोठ्या खेळाची अपेक्षा होती. मात्र, कर्णधाराकडून सर्वांचा अपेक्षाभंग झाला. शुभमन गिल याच्या चुकीमुळे रोहित शुन्यावर बाद झाला.
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामी फलंदाज म्हणून मैदानात आला. भारतला 159 धावांचे लक्ष मिळाले होते. रोहितने डावातल्या पहिल्या चेंडू हळूवार पद्धतीने खेळून काढला. दुसऱ्या चेंडूवर त्याने आक्रमक मारा करत कव्हर ड्राईव्ह खेळला. क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुकीमुळे रोहित धाव घेण्यासाठी पळाला. शुभमन गिल (Shubman Gill) मात्र चेंडूकडे पहात आपल्या जागेवरच उभा राहिला. दोघांनी एकमेकांकडे बघेपर्यंत रोहीत नॉन स्ट्राईकवर पोहचला होता. पण गिलने मात्र जागा सोडली नव्हती. अशात कर्णधाराला धावांचे खाते उघडण्याआधीच तंबूत परतावे लागले.
रोहीत शर्मा विकेट गमावल्यानंतर शुभमन गिलवर भलताच रागावला. गिलच्याही हे लक्षात आले की, त्याच्या चुकीमूळे रोहीत बाद झाला आहे. विकेट गमावल्यानंतर रोहितची मैदानातील प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने गिलवर लाईव्ह सामन्यात नाराजी व्यक्त केली.
रोहीतच्या विकेटनंतर गिलने मोर्चा सांभाळला. तो 12 चेंडूत 23 धावाकरुन आउट झाला. त्याची विकेट जाईपर्यंत भारतीय संघ चांगल्या स्थितीत पोहोचला होता. भारताने हा 17.3 षटकात 6 विकेटने जिंकला. सामन्यानंतर रोहितला रनआउट बद्दल विचारल्यावर तो म्हणाला की, “क्रिकेटमध्ये अशा (रनआउट) गोष्टी घडत असतात. संघासाटी जास्तीत जास्त धावा करायच्या असतात आणि यासाठीचा हा प्रयत्न असतो. पण प्रत्येकवेळीच ते शक्य होत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सामना जिंकणं. गिलने सुंदर खेळ केला. ह्या गोष्टी खेळाचा भाग आहेत. त्यामुळे काही अडचण नाही.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा सामनावीर शिवम दुबे ठरला. दबावाच्या परिस्थितीत दुबेने 60* धावांची अप्रतिम खेळी केली. गोलंदाजी विभागात अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यातील विजयानंतर भारत 1-0 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (14 जानेवारी) इंदोरमध्ये आयोजित केला गेला आहे. (Rohit Sharma who argued with Shubman Gill in the live match won everyone’s hearts after winning the match)
महत्वाच्या बातम्या –
पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानला यजमानांकडून धक्का, दुबेच्या अर्धशतकासह भारत 6 विकेट्सने विजयी
मोहालीत अक्षर आणि मुकेशचा धमाका, मोहम्मद नबीच्या योगदानामुळे अफगाणिस्तानची 158 धावांपर्यंत मजल