क्रिकेटटॉप बातम्या

पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानला यजमानांकडून धक्का, दुबेच्या अर्धशतकासह भारत 6 विकेट्सने विजयी

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना मोहालीमध्ये खेळला गेला. यजमान भारतीय संघाने हा सामना 6 विकेट्स राखून नावावर केला. भारताला विजयासाटी अफगाणिस्तानकडून 159 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात अवघ्या 4 विकेट्सच्या नुकसानावर आणि 17.3 षटकांमध्ये भारताने विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघ 5 विकेट्सच्या नुकसानावर 158 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात भारतासाठी शिवम दुबे याने 60 धावांची सर्वोत्तम खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिली. यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा याने 20 चेंडूत 31 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. तत्पूर्वी सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) शुन्वायवर धावबाद झाला, पण शुबमन गिल याने 23 धावांचे योगदान दिले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर खेळताना तिलक वर्मा 26 धावा करून बाद झाला. फिनिशरच्या रुपात आलेला रिंकू सिंग 16* धावांची खेळी करू शकला. अफगाणिस्तानसाठी मुजीब उर रहमान याने 2 तर, अजमतुल्ला उमरझाई याने 1 विकेट घेतली.

नाणेफेक गमावल्यानंतर अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करावी लागली. अफगाणिस्तानसाठी या सामन्यात त्यांचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. मोहम्मद नबी याने 42 धावांची सर्वोत्तम खेळी केली. अजमतुल्ला उमरझाई याने 29, तर सलामीवीर उब्राहिम झदरान 25 धावांची खेळी करू शकला. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी अप्रतिम प्रदर्शन करत भारतासाठी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानला निर्धारित धावसंख्येवर रोखण्यासाठी शिवम दुबे यानेही 1 विकेट घेतली.

(India defeated Afghanistan by 6 wickets in the first T20I)

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, टिळक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अब्दुल्ला ओमरझाई, नजीबुल्लाह झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, फजलहक फारुकी, नवीन उल हक, मुजीब उर रहमान.

महत्वाच्या बातम्या – 
IND vs AFG । कर्णधार रोहित बनणार सर्वात भारी, कॅप्टन कुलचा मोठा विक्रम निशाण्यावर
Australian Open 2024: ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा ‘ड्रॉ’ जाहीर, पाहा जोकोविचसमोर आहे कुणाचे आव्हान

Related Articles