आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये रविवारी (दि.23ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील महामुकाबला मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा एखाद्या आयसीसी स्पर्धेत कर्णधाराच्या रूपात पदार्पण करणार आहे. 2021 पासून कर्णधार पदाची धुरा पुर्णपणे संभाळणारा रोहित आज पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. याआधी, 2022 आशिया कपमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरलेला, ज्यात भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यात अपयश आलेले. रोहित शर्मा पाकिस्तान विरूद्ध कर्णधाराच्या भुमिकेत पदार्पण करत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि सहकारी खेळाडू विराट कोहली यांच्या विशेष क्लबमध्ये सामील होणार आहे.
टी20 विश्वचषकाचे आतापर्यंत 7 हंगाम झाले आहेत आणि त्यात भारताने दोन दिग्गजांनी कर्णधारपद सांभाळले आहे. 2007 मध्ये भारताला पहिल्यांदा विश्वविजेता बनवणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) सर्वात जास्त वेळा म्हणजेच 6 वेळा टी20 विश्वचषकात भारताचे कर्णधारपद भुषवले आहे, तर विराट कोहली हा 2021 च्या विश्वचषकात भारताचा कर्णधार होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारत 2007 मध्ये विश्वविजेता बनलेला, तसेच भारताने 2014च्या विश्वचषकात अंतिम फेरीमध्ये आणि 2016च्या विश्वचषकात उपांत्यफेरीच्या सामन्यापर्यंत मजल मारली होती. त्यानतंर 2021च्या विश्वचषकात विराट कोहली (Virat Kohli) भारताचा कर्णधार झाला. त्या विश्वचषकात भारत साखळी सामन्यांमध्येच बाहेर पडला.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आता टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तिसरा कर्णधार बनणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी त्याने मैदानात पाय टाकताच हा विक्रम त्याच्या नावावर होईल. चाहत्यांना कर्णधार रोहितकडून विश्वचषक स्पर्धेत खूप अपेक्षा आहेत. धोनीच्या नेतृत्वात 2007 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मागच्या 15 वर्षात भारतीय संघाने एकही टी-20 विश्वचषक जिंकला नाहीये. यावर्षी संघाचे नेतृत्व करताना रोहित भारताला इतिहासातील दुसरा टी-20 विश्वचषक जिंकवून देईल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. रोहित एक उत्कृष्ट कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वात भारताने अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या आहेत. आयपीएलमध्ये मुंभई इंडियन्सने त्याच्याच नेतृत्वात सर्वाधिक पच विजेतेपद जिंकले आहेत.
भारताची संभावित प्लेइंग इलेवन : रोहित शर्मा ( कर्णधार ), के.एल. राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत/ अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने काय लावलाय दिवा? आकडेवारी खूपच महत्त्वाची
कोरोनाचा धाकच संपला! चक्क कोविडबाधित असून या खेळाडूने केले श्रीलंकेशी दोन हात