आयपीएल 2025 च्या आधी अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आता असे सांगण्यात येत आहे की मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी फ्रेंचायझी सोडू शकतो. मात्र, आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी संघाकडून खेळणार असल्याची चर्चा होती. आता या अटकळांमध्येच समोर आलेल्या अहवालाने सर्वांनाच धक्का दिला आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले होते, त्यानंतर रोहित शर्मा आयपीएल 2025 मध्ये फ्रँचायझी सोडू शकतो अशा बातम्या समोर आल्या होत्या. आता ‘दैनिक जागरण’च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सला अलविदा म्हणू शकतो. इतकेच नाही तर हिटमॅन मुंबई सोडून कोलकाता नाईट रायडर्सचा भाग बनू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवबद्दलही अहवालात म्हटले आहे की, तोही फ्रेंचायझी सोडू शकतो.
आयपीएल 2024 च्या हंगामापूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून टाकून हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार म्हणून नियुक्त केल्याने चाहते अजिबात खूश नव्हते. पाच वेळा फ्रँचायझी विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवायला नको होते, असे चाहत्यांना वाटत होते. रोहित शर्माने 2013 मध्ये मुंबईची कमान सांभाळण्यास सुरुवात केली आणि 2023 पर्यंत तो कर्णधार राहिला. या काळात मुंबईने रोहितच्या नेतृत्वाखाली 5 विजेतेपदे जिंकली.
मात्र, रोहित शर्माच्या मुंबई पासून दूर होण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत 2025 च्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा कोणत्या फ्रेंचायझीसाठी खेळतो हे पाहणे मनोरंजक असेल. उल्लेखनीय म्हणजे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 टी-20 विश्वचषक जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकादाैऱ्यापूर्वी हेड कोच ‘गंभीरची’ पहिली पत्रकार परिषद या दिवशी होणार, निवडकर्ता अजित आगरकरही उपस्थितीत
IPL 2025: मेगा ऑक्शनपूर्वी बीसीसीआय आणि संघ मालक येणार एकत्र; पाहा बैठकीचा मुख्य अजेंडा
हरमनप्रीत कौरला मागे टाकत ‘स्टार’ खेळाडू स्म्रीती मानधनानं रचला इतिहास!