विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघासमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या थरार रंगणार आहे. भारतीय संघ चांगल्याच फॉर्ममध्ये असला तरी हे विसरुन चालणार नाही की इंग्लंड संघाने २०११, २०१४ आणि २०१८ मध्ये मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभूत केले होते. हा दौरा सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटूंनी अशा एका फलंदाजाचे नाव सांगितले आहे, जो इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत कमीत कमी तीन शतकं झळकावू शकतो.
भारतीय संघाचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना विश्वास आहे की, रोहित शर्मा आगामी इंग्लंड दौऱ्यावर कमीत कमी ३ शतक झळकावेल, पण त्यासाठी त्याला योग्य शॉट्सची निवड करावी लागेल.
त्यांनी क्रिकेट एनालिस्ट पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “त्याच्या बाबतीत हे पहिल्या दोन तीन षटकात नेहमी होते की त्याचा पुढचा पाय चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचत नाही. परंतु एक दोन षटकानंतर त्याचा पाय चेंडूच्या पीच जवळ पोहचायला सुरुवात होते, तेव्हा तो चांगला खेळतो. ऑस्ट्रेलियामध्ये देखील त्याने जास्त धावा केल्या नव्हत्या, परंतु त्याने वेगवान गोलंदाजांना खेळण्यासाठी जो वेळ घेतला तो अविश्वसनीय होता. त्याच्याकडे इतका वेळ होता की, ऑस्ट्रेलियन गोलंदाज १४० च्या गतीने गोलंदाजी करत होते. परंतु रोहितने त्या वेगवान चेंडुंना ६० च्या गतीसारखे बनवले होते.” Rohit sharma will score minimum 3 hundreds says Sunil Gavaskar)
रोहित ठोकणार ३ शतक…
सुनील गावसकर पुढे म्हणाले,”तो नेहमी आक्रमण करायच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे शॉटची निवड करताना चूक झाली की, तो बाद होतो. परंतु तोच शॉट खेळण्यास त्याला यश आले तर तो या पाच सामन्यांच्या मालिकेत ३ शतक झळकावू शकतो.”
रोहित शर्मा हा चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. तो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. तसेच या स्पर्धेत भारतीय संघाकडून १००० धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-न्यूझीलंड संघांच्या नियमांमध्ये भेदभाव? भारतीय संघ व्यवस्थापनाची आईसीसीकडे तक्रार
धवनचा संघ चिंतेत, श्रीलंका बोर्डाकडून भारतीय संघाच्या ‘या’ महत्त्वाच्या मागणीस नकार
सराव आणि तोही टॉसचा! इंग्लिश कर्णधाराचा व्हिडिओ होतोय व्हायरल