मुंबई। गुरुवारी (१२ मे) मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधील (IPL 2022) ५९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ५ विकेट्सने पराभव केला. हा मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या १५ व्या हंगामातील तिसरा विजय आहे. पण, असे असले तरी अनेकांना प्रश्न पडला होता की, या सामन्यात मुंबईने अनुभवी अष्टपैलू कायरन पोलार्ड याला का खेळवले नाही. आता याबद्दल मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्रिकेट संचालक झहिर खान यांनी खुलासा केला आहे.
विशेष म्हणजे गुरुवारी पोलार्डचा (Kieron Pollard) वाढदिवसही होता. पण असे असतानाही त्याला चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या अंतिम ११ जणांच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. याबद्दल सांगताना रोहित (Rohit Sharma) म्हणाला, ‘पोलार्ड मुंबईचा दिग्गज खेळाडू आहे. आम्हाला त्याच्या क्षमतेवर संशय नाही. मी नाणेफेकीवेळीदेखील सांगितले की, पोलार्ड स्वत: पुढे आला आणि त्याने असे करण्यात सांगितले. कारण आम्हाला अन्य खेळाडूंना आजमवून पाहायचे होते. जर आम्हाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असती, तर कदाचीत असे झाले नसते.’
तो पुढे म्हणाला, ‘आमची नजर त्या कमजोरींकडेही होती, ज्यांना आम्हाला दूर करायचे आहे आणि त्यांची पुनरावृत्ती करू इच्छित नाही. या गोष्टींचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आणि पोलार्डने स्वत: येऊन सांगितले की त्याला काही समस्या नाही.’
त्याचबरोबर झहिर खानने (Zaheer Khan) सांगितले की, ‘पोलार्ड मुंबईचा दिग्गज खेळाडू आहे. त्याने येऊन सांगितले की, त्याला याबद्दल काही समस्या नाही. भविष्यातील कमजोरी दूर करण्याकडे आमचे लक्ष आहे.’
पोलार्ड २०१० सालापासून मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याला आयपीएल २०२२ हंगामापूर्वी ६ कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्सने संघात कायम केले आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १८९ सामने खेळले असून २८.६७ च्या सरासरीने ३४१२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १६ अर्धशकांचा समावेश आहे. तसेच त्याने ६९ विकेट्स देखील घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
शर्माची जागा घेणार वर्मा? लवकरच ‘या’ खेळाडूच्या कपाळावर लागणार मुंबईच्या कर्णधारपदाचा ‘तिलक’
द्रविडच्या साधेपणाने पुन्हा जिंकली लाखो मने! बुक स्टोअरमधील फोटो होतोय तुफान व्हायरल
पॉवरप्लेमध्ये सीएसकेचा मुकेश चौधरी बनला ‘सुपर किंग’, ‘या’ विक्रमात शमीला पछाडले