रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसेल. हार्दिक पंड्या याला मुंबईच्या नव्या कर्णधाराच्या रुपात नियुक्ती मिळाली आहे. शुक्रवारी (15 डिसेंबर) फ्रँचायझीने घेतलेला हा निर्णय चाहत्यांना सांगितला गेला. मागच्या काही दिवसांपासून या निर्णयासाठी मुंबई इंडियन्सकडून पावले टाकली जात होती. पण चाहत्यांना हा निर्णय आवडला नाही, असेच दिसते. कारण आहे कर्णधार म्हणून रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी केलेली कामगिरी.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारतीय संघ मागच्या काही वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्येही रोहित सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिला आहे. एमएस धोनी याच्याप्रमाणेत रोहितनेही कर्णधार म्हणून पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. या पाचही ट्रॉफी त्याने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना जिंकल्या. आयपीएल 2013 मध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे पहिल्यांदा नेतृत्व केले आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर आयपीएल 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबईने रोहितच्याच नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकली. मागच्या सलग तीन हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळाले नाही. आगामी हंगामात रोहित विजेतेपदसाठी संघाचे नेतृत्व करेल, असी अपेक्षा चाहत्यांची होती. पण त्याआधीच संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या हातात सोपवले गेले आहे.
कर्णधार म्हणून रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी केलेली कामगिरी
– आयपीएल 2013 – विजेतेपद
– आयपीएल 2015 – विजेतेपद
– आयपीएल 2017 – विजेतेपद
– आयपीएल 2019 – विजेतेपद
– आयपीएल 2020 – विजेतेपद
मागच्याा 10 हंगामांपासून रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार होता. कर्णधार म्हणून रोहित शर्माने मुंबईसाठी एकूण 158 सामने खेळले. यातील 87 सामन्यात मुंबईला विजय, तर 5 विजेतेपद नावावर केले. आगामी हंगामात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात संघाचे प्रदर्शन कसे राहते, हे पाहण्यासारखे असेल. (Rohit Sharma’s performance as captain for Mumbai Indians)
महत्वाच्या बातम्या –
Mumbai Indians । नवा कर्णधार निवडला पण फ्रँचायझीसाठी रोहित अमूल्य! खास व्हिडिओतून दिला ट्रिब्यूट
आशिया चषक 2023। पाकिस्तानपाठोपाठ भारताचा अंडर-19 संघ सेमीफायनलमध्ये पराभूत, बांगलादेश फायनलमध्ये दिमाखात प्रवेश