आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीतील भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात भारताचा दारून पराभव झाला. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेत रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. रोहितने या सामन्यातील शएवटच्या षटकांत अर्शदीप सिंगला दुर्लक्षित केल्यातचा व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आणखी एका व्हिडिओने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे.
#captaincy #ViratKohli
Bad behaviour rohit sharma pic.twitter.com/ndeOUtY6SJ— Aniket Patil ???????? (@AniketBhutavale) September 6, 2022
या व्हिडिओमध्ये भुवनेश्वर कुमारने एक सोपा झेल सोडल्याचे दिसत आहे. त्यानंतर रोहितने पायाने बॉल भुवनेश्वर कुमारच्या दिशेने मारला. तो बॉल भुवनेश्वर कुमारला लागला असता तर त्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. या व्हिडिओमार्फत नेटकऱ्यांनी रोहितच्या खराब स्वभावावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा व्हिडिओ या सामन्यातील नसून हा एक जूना व्हिडिओ य्सल्याचे सिद्ध झाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चिंता नको! सलग 2 पराभवांनंतरही भारत गाठू शकतो फायनल, अशी आहेत समीकरणे
पाकिस्तानचा एक विजय भारत-अफगाणिस्तानला करेल बाहेर, PAKvsAFG सामन्याबद्दल वाचा सर्वकाही
भारत आता अफगाणिस्तान भरोसे, नबी अन् संघाला पाकिस्तानविरुद्ध करावं लागेल ‘हे’ काम






