---Advertisement---

रोहित ठरला विराट-धोनीला भारी; भारतात केली कोणालाही न जमलेली कामगिरी

On: सोमवार, फेब्रुवारी 21, 2022 1:37 PM
Rohit-Sharma-Virat-Kohli
---Advertisement---

कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात (India vs West Indies) नुकतीच ३ सामन्यांची टी२० मालिका ई़डन गार्डन्स स्टेडियमवर पार पडली. या मालिकेत भारताने ३-० अशा फरकाने विजय मिळवला. या मालिकेतील अखेरचा सामना भारताने १७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या (Rohit Sharma) नावावर मोठे विक्रम झाले आहेत. 

रोहितच्या नावावर मोठे विक्रम 
वेस्ट इंडिजविरुद्ध रविवारी (२० फेब्रुवारी) झालेला तिसरा टी२० सामना जिंकल्याने रोहित शर्मा मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विजय मिळवणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर मिळवलेला हा १४ वा विजय ठरला.

रोहितने आत्तापर्यंत कर्णधार म्हणून भारतात १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यातील १४ सामन्यात विजय मिळवला असल्याने त्याने विराट कोहली याच्या (Virat Kohli) विक्रमाला मागे टाकले आहे. विराटने मायदेशात कर्णधार म्हणून १३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकले आहेत, तर एमएस धोनीने कर्णधार म्हणून मायदेशात १० विजय आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये मिळवले आहेत (Most T20I matches won on home soil as Captain for India).

याशिवाय जगातील एकूण कर्णधारांचा विचार करायचा झाल्यास रोहित मायदेशात आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक विजय मिळणारा दुसऱ्या क्रमांकाच कर्णधार ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर संयुक्तरित्या ओएन मॉर्गन आणि केन विलियम्सन विराजमान आहेत. इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने आणि न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सनने आपापल्या मायदेशात नेतृत्त्व करताना प्रत्येकी १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमाकांवर १३ विजयांसह ऍरॉन फिंच आणि विराट कोहली संयुक्तरित्या आहेत.

रोहितने मिळवला सलग ९ वा विजय
रोहितसाठी कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील हा सलग ९ वा विजय ठरला. त्यामुळे सर्वाधिक सलग आंतरराष्ट्रीय टी२० विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत रोहितने विराटला मागे टाकले आहे. विराटने २०२० वर्षात सलग ८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने कर्णधार म्हणून जिंकले होते.

भारताने जिंकली टी२० मालिका
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतील सर्व तिन्ही सामने जिंकले. भारताने पहिला सामना ६ विकेट्सने जिंकला. तसेच दुसरा सामना ८ धावांनी आणि दुसरा सामना १७ धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या – 

वृद्धीमान सहाला धमकावणाऱ्या पत्रकाराची आता खैर नाही, बीसीसीआय करू शकते कारवाई

भारताविरुद्धच्या पराभवाचे पोलार्डने सांगितले कारण, म्हणाला, ‘आम्ही भारताच्या डावाच्या…’

वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप दिल्यानंतर कर्णधार रोहितची खास प्रतिक्रिया, आगामी मालिकेत ‘यांना’ मिळणार संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---