कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू आपापल्या घरात वेळ घालवत आहेत. अशामध्ये अनेक खेळाडू आपला सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत.
भारतीय संघाचे क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युजवेंद्र चहलही (Yuzvendra Chahal) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर चहल आणि रोहितची इंस्टाग्राम चॅट जोरदार व्हायरल होत आहे. या चॅटदरम्यान रोहितला त्याच्या पुल शॉटवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रोहितने मजेशीर उत्तर दिले.
चहलने रोहितला प्रश्न विचारला होता की, “तुला पुल शॉट (Pull Shot) खेळताना जी ताकद येते ती आता वाढली की कमी झाली?” यावर रोहितने मजेदार उत्तर देत म्हणाला, “तुला तर माहितच आहे की मी झोपेतून उठूनही पुल शॉट मारतो.
नुकतीच आयसीसीने सर्वात चांगला पुल शॉट मारणाऱ्या फलंदाजांंच्या यादीत रोहितला स्थान दिले नव्हते. यानंतर रोहितने आयसीसीला ट्रोल केले होते. त्याचमुळे चहलने रोहितला पुल शॉटबद्दल प्रश्न विचारला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
टीम इंडियाच्या नावावर आहेत हे ५ अतिशय खराब विक्रम
-पहिला त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी सेहवागने केली होती ३ वर्ष आधीच
-ज्या गोलंदाजाला रोहितने धु-धु धुतले, तो आता अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट