सिडनी। आज( 25 नोव्हेंबर) आॅस्ट्रलिया विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.
या सामन्यात भारताचा मर्यादीत षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माला एक खास विक्रम करण्याची संधी होती. त्याने जर या सामन्यात 4 षटकार मारले असते तर त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 षटकार मारण्याचा टप्पा गाठला असता.
आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 आणि त्यापेक्षा जास्त षटकार मारण्याचा पराक्रम विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गप्टील या दोघांनीच केला आहे.
पण रोहितला या सामन्यात दोनच षटकार मारण्यात यश आले. तो 1 चौकार आणि 2 षटकारांसह 16 चेंडूत 23 धावा करुन बाद झाला. त्याला आॅस्ट्रेलियाच्या अॅडम झम्पाने त्रिफळाचीत केले.
त्यामुळे रोहितला आता हा विक्रम करण्यासाठी पुढच्या वर्षाची वाट पहावी लागणार आहे. कारण भारतीय संघ 6 डिसेंबर 2018 पासून आॅस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका 7 जानेवारी 2019 पर्यंत आहे.
त्यामुळे भारत आता थेट फेब्रुवारी 2019मध्ये न्यूझीलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मालिका खेळणार आहे. यामुळे रोहितला आता पुढीलवर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत हा पराक्रम करण्याची संधी मिळेल.
रोहितचे सध्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 98 षटकार पूर्ण झाले आहेत. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर संयुक्तरित्या विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गप्टील आहे. या दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 103 षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
103 – ख्रिस गेल (56 सामने)
103 – मार्टीन गप्टील (75 सामने)
98 – रोहित शर्मा (90 सामने)
91 – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)
83 – कॉलीन मुनरो (48 सामने)
महत्त्वाच्या बातम्या:
–किंग कोहलीने मोडला ब्रेंडन मॅक्यूलमचा विक्रम, शोएब मलिकचाही विक्रम आहे धोक्यात
–रोहित शर्माच्या ‘विराट’ विश्वविक्रमाशी कर्णधार कोहलीने केली बरोबरी
–विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा आॅस्ट्रलियावर 6 विकेट्सने विजय
–हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’





