भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना सध्या धरमशाला याठिकाणी सुरू आहे. धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव आटोपला. 218 धावा करून इंग्लंडने सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या डावात भारतासाठी शतकी खेळी केली. यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके केली. पण त्यआधी भारताच्या गोलंदाजीवेळी रोहित शर्मा आणि सरफराज खान यांच्यातील एक गमतीशीर प्रसंगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील हा शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (7 मार्च) धरमशालेत सुरू झाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात आपल्या फटकेबाजी आणि नेतृत्वगुणांसाठी चर्चेत असतो. पण चर्चा होती ती म्हणजे रोहितच्या मजेशीर स्वभावाची. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत देखील रोहित सरफराज खान (Sarfaraz Khan) याला आपल्या हाताने पकडून श्रेत्ररक्षणासाठी उभा करताना दिसत आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात 40व्या षटकातील हा व्हिडिओ आहे. त्यावेळी जॉनी बेअरस्टो स्ट्राईकवर होता. रोहितची श्रेत्ररक्षण लावण्याची ही पद्धथ पाहून समालोचक देखील हसू लागले.
Clearly, Rohit Sharma is bullying Sarfaraz Khan.👎👎#RohitSharma #Cricket #INDvENG pic.twitter.com/HO7iOGesfB
— Let’s Troll Pakistan (@troll_pakistann) March 7, 2024
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नामेफेक जिंकून भारताला प्रथम गोलंदाजी करायला लावली. पहिल्या डावात 218 धावांवर पाहुण्यांना भारतीय गोलंदाजांनी गुंडाळले. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारताने 3 बाद 376 धावा केल्या. म्हणजे यजमान संघाने धरमशाला कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडवर मोठी आघाडी घेतली आहे. (Rohit’s work should be done by Rohit! The captain holds the hands of the players and sets the fielding, watch the funny VIDEO)
धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –
धरमशालेच्या थंडीत सरफराजनं फोडला इंग्लिश गोलंदाजांना घाम! झळकावलं झंझावाती अर्धशतक
दिग्गज पंच मारायस इरास्मस निवृत्त, 2019 च्या वर्ल्डकप फायनलसह अनेक ऐतिहासिक क्षणांचे राहिले साक्षीदार