भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन स्पोर्ट्स प्रेजेंटर आहे. संजना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सामन्यामध्ये आयसीसीची डिजिटल इनसाईडर होती. या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून 8 विकेटने पराभव पत्करावा लागला. आता या सामन्यानंतर भारतीय संघाकडे जवळपास 1 महिन्याचा विश्रांतीसाठी वेळ आहे. त्यानंतर भारताला ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
त्यामुळे मिळालेल्या विश्रांतीच्या वेळेत भारतीय खेळाडू आपल्या कुटुंबासमवेत इंग्लंडमध्ये वेळ घालवत आहेत. दरम्यान, या अंतिम सामन्यानंतर संजना गणेशन आणि जसप्रीत बुमराह सध्या लंडनमध्ये गेले आहेत.
भारतीय संघ जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर निघाला होता तेव्हा संघाला आपल्या परिवाराला सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे जसप्रीत बुमराहसोबत पत्नी संजना गणेशन देखील इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाली होती. परंतु याच्या व्यतिरिक्त संजना गणेशन स्पोर्ट्स प्रेजेंटर म्हणून देखील काम पाहात होती.
संजना बुमराहसोबत पुढील तीन महिन्यांपर्यंत इंग्लंडमध्ये राहणार आहे. याचदरम्यान संजनाने आपल्या पतीसाठी रोमँटिक जेवण बनवले आहे. संजनाने बुमराहसाठी बनविलेल्या जेवणाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. संजयने गार्लिक ब्रेड आणि पास्ता बनविला आहे. त्यावर तिने लिहिले होते की, ‘प्रेमाने बनविला आहे.’
जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुट्टी दिली आहे. भारतीय संघ या सुट्टीनंतर इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये एकत्र येणार आहेत. 4 ऑगस्टपासून नॉटिंघममध्ये इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
परंतु, या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे, ती म्हणजे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान ईशांत शर्माला गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. ईशांत शर्माच्या हाताला टाके पडले आहेत. त्यामुळे आता तो मालिकेपूर्वी तंदुरुस्त होणार का हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी अजिंक्यपदमध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज, अंतिम सामन्यात फ्लॉप ठरलेल्या बुमराहचाही समावेश
किवी खेळाडूचा संघाला घरचा आहेर; म्हणे, ‘१३९ धावा करायला इतका वेळ लागेल वाटले नव्हते’
गोलंदाजीत हातखंडा असलेल्या चाहरने केला फलंदाजीचा सराव; म्हणाला, ‘शाळेचे दिवस आठवले’