पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा आपल्या बेताल वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. पण यावेळी रमीझ राजाने अशी काही गोष्ट सांगितली की, ऐकून तुम्ही हसू आवरू शकणार नाही. वास्तविक, रमीझ राजा म्हणाला की, पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा आहार नासाच्या शास्त्रज्ञांनी सेट केला आहे.
रमीज राजा (Rameez Raja) याच्या या बेताल वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ कुठल्यातरी शोचा असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये रमीझ राजाला असे म्हणताना ऐकू येते की, “फुटबॉलच घ्या, ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याचा डाएट प्लॅन नासाच्या शास्त्रज्ञांनी सेट केला आहे.” या व्हायरल व्हिडीओवर लोकांनी खूप गमताशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका यूजरने लिहिले की, “म्हणूनच तो आता पीसीबीचा अध्यक्ष नाही.” याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, “पाकिस्तानमध्ये शिक्षण किंवा सामान्य ज्ञानावर बंदी आहे का?” आणखी एका युजरने लिहिले, “आणि हा माणूस पीसीबीचा अध्यक्ष होता. असे बरेच लोक असतील जे त्यावर विश्वास ठेवतील आणि त्याचा बचाव करतील.” वापरकर्त्याने हसणारे इमोजी देखील वापरले. त्याचप्रमाणे लोकांनीही या व्हिडिओला रंजक आणि मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Former PCB chairman Ramiz Raja says NASA's scientists set Cristiano Ronaldo's diet plan 😱🥩pic.twitter.com/Xk5W1EnneM
— Farid Khan (@_FaridKhan) November 22, 2023
2023 च्या विश्वचषकातील अत्यंत खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघात अनेक बदल पाहायला मिळाले. पुरुष संघाच्या निवड समितीत बदल करण्यात आला. याशिवाय कोचिंग स्टाफमध्येही बदल दिसून आले. सर्वात मोठा बदल कर्णधाराच्या रूपात पाहायला मिळाला. 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानचे नेतृत्व करणाऱ्या बाबर आझम (Babar Azam) याने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर शान मसूदला कसोटीचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला टी20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. (Ronaldo diet set by NASA scientists Rameez Raja havoc found viral)
म्हत्वाच्या बातम्या
BREAKING: वर्ल्डकप संपताच ICCने उचललं मोठं पाऊल, माजी वर्ल्ड चॅम्पियनवर घातली 6 वर्षांची बंदी
कर्णधार बनताच सूर्याने युवा टीम इंडियाला दिली सूट; म्हणाला, ‘मी स्पष्ट शब्दात सांगितलंय, जावा आणि…’