इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूट (Joe Root) सध्या उत्कृष्ट फाॅर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. तत्पूर्वी लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान जो रूटने दुसऱ्या डावात 12 धावा करत मोठी कामगिरी केली. त्याने अजून एक रेकाॅर्ड त्याच्या नावावर केला आहे.
जो रूटने (Joe Root) सर्वाधिक कसोटी धावांच्या बाबतीत श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराला (Kumar Sangakkara) मागे टाकले आहे. या यादीत रूट सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 12 धावा करून रूटने हा रेकाॅर्ड केला आहे. रुटच्या नावावर आता कसोटीत 12,402 धावा आहेत. कुमार संगकाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत 12400 धावा केल्या होत्या.
श्रीलंका सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडने विजय मिळवला आहे. या कसोटी मालिकेत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने अप्रतिम कामगिरी केली आहे. तो कसोटीमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या कसोटी मालिकेत अनेक रेकाॅर्ड्स त्याच्या नावावर केले आहेत. रूटने त्याच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत आतापर्यंत 34 शतके झळकावली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
1) सचिन तेंडुलकर- 15,921
2) रिकी पाॅन्टिंग- 13.378
3) जॅक कॅलिस- 13,289
4) राहुल द्रविड- 13,288
5) एलिस्टर कुक- 12,472
6) जो रूट- 12,402
7) कुमार संगकारा- 12,400
महत्त्वाच्या बातम्या-
“धोनीने आयुष्यभर क्रिकेट खेळत राहावे”, सीएसकेच्या युवा गोलंदाजाचे मन जिंकणारे वक्तव्य
असे भारतीय कर्णधार, ज्यांनी एकही कसोटी सामना गमावला नाही
‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरचे 3 महान रेकाॅर्ड कोणत्याही फलंदाजासाठी मोडीत काढणे अशक्य