---Advertisement---

पराभवानंतरही रूटने ‘असे’ भाष्य करत जिंकले भारतीय चाहत्यांचे मन; म्हणाला…

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 7:48 PM
---Advertisement---

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत दारुण पराभव पत्करल्यानंतर दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत पाहुण्या इंग्लंडला पराभूत केले. भारताने दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला ३१७ धावांच्या मोठ्या फरकाने लोळविले. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ दुसर्‍या डावात फक्त १६४ धावा करू शकला. भारताच्या या विजयामुळे चार कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे.‌ सामन्यानंतर, इंग्लंडचा कर्णधार जो रूटने पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना सर्वांची मने जिंकली.

भारतीय संघाचा मोठा विजय

अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने पहिल्या डावात १६१ धावांची लाजवाब खेळी केल्याने भारतीय संघाने ३२९ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे, भारतीय संघाला १९५ धावांची आघाडी मिळाली. रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात शतकी खेळी करून, भारतीय संघाला सुस्थितीत आणले. विजयासाठी मिळालेले ४८२ धावांचे आव्हान दिले गेले. हे आव्हान इंग्लंड संघाला पेलवली नाही आणि भारताने ३१७ धावांनी विजय साकारला. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विनची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

रूटने जिंकली मने

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने सर्वांची मने जिंकली. त्याने, भारतीय संघाचे कौतुक केले. रूट म्हणाला, ‘या विजयाचे श्रेय भारतीय संघाला दिलेच पाहिजे. त्यांनी आम्हाला खेळाच्या तिन्ही विभागात मात दिली. आम्हाला यामुळे धडा मिळाला आहे की, अशा प्रकारच्या खेळपट्टीवर धावा कशा बनवायच्या. एका फलंदाजाला दबाव टाकणे आणि षटकातील सहा चेंडू खेळून काढण्याची कला आम्हाला शिकावी लागेल.’

रूटने या पत्रकार परिषदेत दुसऱ्या सामन्यात झालेल्या चुकांविषयी उलगडा केला. तसेच, मालिकेतील उर्वरित दोन सामान्यांसाठी वेगळी रणनीती करण्याविषयी सांगितले.

कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे रूट

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असलेला जो रूट आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंकेत झालेल्या दोन कसोटी सामन्यात एक शतक व एका द्विशतकाच्या साहाय्याने ४२८ धावा ठोकल्या होत्या. तसेच भारतावरचा पहिल्या कसोटीतही त्याने द्विशतक साजरे केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

कॉट आणि बोल्ड बाय दिशा! भारतीय क्रिकेटर जयंत यादव अडकला लग्नाच्या बेडीत 

धोनीसोबत पत्नीला धरायचा होता ठेका, पण कॅप्टनकूल जागचा उठला सुद्धा नाही; पाहा पुढं काय झालं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---