इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (०३ सप्टेंबर) भारतीय संघ पुनरागमन करताना दिसला. इंग्लिश संघाने पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली असली तरी दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या जोडीने शानदार सुरुवात करत सामन्यात भारतीय संघाचे आव्हान जिवंत ठेवले आहे. यादरम्यान संघाचा दुसरा डाव सुरू असताना सलामीवीर रोहित शर्मा बाद होण्यापासून थोडक्यात बचावला.
दुसऱ्या डावाच्या तिसऱ्या षटकात ही घटना घडली. तेव्हा जेम्स अँडरसन गोलंदाजी करत होता. या षटकातील त्याचा तिसरा चेंडू रोहितच्या बॅटच्या काठावर लागला. पण सेकंड स्लिपमध्ये उभा असलेल्या रोरी बर्न्सने मोठी चूक केली. बर्न्सचे चेंडूकडे अजिबात लक्ष नव्हते आणि हेच कारण होते की, तो झेल पकडण्याचा प्रयत्नही करू शकला नाही. चेंडू थेट त्याच्या बुटाला लागला आणि सीमेच्या दिशेने गेला. परिणामी हिटमॅनला मोठे जीवनदान मिळाले.
बर्न्सची ही चूक भारतीय संघासाठी वरदान ठरू शकते. जर रोहितने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चांगली फलंदाजी केली तर इंग्लिश संघाला त्याचा फटका सहन करावा लागू शकतो.
https://twitter.com/mscmedia2/status/1433859484997152774?s=20
भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता ४३ धावा केल्या आहेत आणि आता ते इंग्लिश संघाच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येपासून ५६ धावांनी मागे आहेत. रोहित २० तर केएल राहुल २४ धावांवर नाबाद आहेत.
Rory Burns couldn't spot Rohit's edge there. pic.twitter.com/Tz5TgBIj4J
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 3, 2021
याआधी, ओव्हल कसोटीत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवात चांगली करता आली नव्हती. भारताचे रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा हे प्रमुख फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले होते. केवळ विराटने अर्धशतकीय खेळी करत थोडीफार झुंज दिली होती. जरी प्रमुख फलंदाज अपयशी ठरले तरी, तळातल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या शार्दुल ठाकूरने मात्र आक्रमक फलंदाजी करत ५७ धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. त्यामुळे सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता.
प्रत्युत्तरात इंग्लंडकडून पहिल्या डावात ओली पोपने ८१ धावांची खेळी केली आणि ख्रिस ओक्सने ५० धावांची अर्धशकीय खेळी करून इंग्लडला ९९ धावांची आघाडी मिळवून दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
वेगवान गोलंदाज अँडरसनचे फलंदाजीत अनोखे ‘शतक’, भल्याभल्यांनाही नाही जमला हा पराक्रम
भारताकडून घोडचूक, मोईन बाद होऊनही केली नाही अपील; इंग्लंडला फुकटात मिळाल्या ७२ धावा!
अवघ्या १४२ धावा करताना न्यूझीलंड संघाच्या नाकीनऊ, सलग दुसऱ्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव