---Advertisement---

१००वा कसोटी सामना खेळणाऱ्या रॉस टेलरचे असे झाले मैदानात स्वागत, पहा व्हिडिओ

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2020 2:02 PM
---Advertisement---

वेलिंग्टन।न्यूझीलंज विरुद्ध भारत संघात सध्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु आहे. हा सामना न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरसाठी खास ठरला आहे. कारण हा त्याच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे.

तसेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी20 या तीन्ही प्रकारात प्रत्येकी 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्यामुळे तो आज(22 फेब्रुवारी) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टॉम ब्लंडेल बाद झाल्यानंतर जेव्हा पहिल्या डावात फलंदाजीला आला. त्यावेळी त्याचे मैदानात जोरदार स्वागत झाले.

तो जेव्हा ड्रेसिंग रुममधून मैदानात येत होता, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी उभे राहुन टाळ्या वाजवत त्याचे स्वागत केले. याचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच हा व्हिडिओ शेअर करताना आयसीसीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘रॉस टेलर त्याच्या 100 व्या कसोटीत फलंदाजीला जात असताना त्याला प्रेक्षकांनी उभे राहुन मानवंदना दिली.’

https://twitter.com/ICC/status/1231054756547907586

टेलर हा 100 कसोटी सामने खेळणारा न्यूझीलंडचा चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी न्यूझीलंडकडून डॅनिएल विट्टोरी(112), स्टिफन फ्लेमिंग(111) आणि ब्रेंडन मॅक्यूलम(101) यांनीच 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

टेलरने आज न्यूझीलंडकडून पहिल्या डावात कर्णधार केन विलियम्सनला भक्कम साथ देताना 71 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 44 धावांची खेळी केली. त्याला इशांत शर्माने बाद केले. पण त्याआधी त्याने विलियम्सनबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला भक्कम स्थितीत उभे केले होते.

या सामन्यात न्यूझीलंडने आज दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 71.1 षटकात 5 बाद 216 धावा केल्या आहेत. तसेच 51 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने 89 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच तत्पूर्वी न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात 165 धावांवरच रोखले आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1231124130625355777

https://twitter.com/Maha_Sports/status/1231112567021604869

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---