पुणे (16 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आजचे सामने एकतर्फी झाले. कोल्हापूर संघाने नंदुरबार संघाचा विजय रथ रोखला. नाशिक, सांगली व पालघर संघानी विजय मिळवले. आजच्या खेळानंतर सांगली संघ पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर कोल्हापूर, पालघर व नंदुरबार संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
आजच्या पहिल्या सामन्यात नाशिक संघाने सातारा संघावर एकतर्फी विजय मिळवला. ऋषीकेश गडाखच्या 16 गुणांच्या आक्रमक खेळीने नाशिक संघाचा विजय सोपा झाला. तर गणेश गीतेच्या बचवा समोर साताराच्या चढाईपटूंनी अक्षरशः गुडघे टेकले. गणेश गीते ने पकडीत 9 गुण मिळवले. आजच्या दुसऱ्या सामन्यात कोल्हापूर संघाने पहिल्या क्रमांकावर असलेल्या नंदुरबार संघाला एकतर्फी मात दिली. कोल्हापूर कडून सौरभ फगारे व ओमकार पाटील ने सुपर टेन पूर्ण करत विजयात मोलाची भूमिका निभावली. तसेच दादासो पुजारी व धनंजय भोसले ने बचावत उत्कृष्ट खेळ दाखवला.
आजच्या तिसऱ्या सामन्यात सांगली संघाने 61-18 असा धाराशिव संघाचा धुव्वा उडवला. अभिराज पवार ने सर्वाधिक 16 गुण मिळवले. तर प्रणव माने ने हाय फाय पूर्ण केला. वृषभ साळुंखे ने चढाईत 8 गुण मिळवले. तर आजचा चौथा सामना मध्यंतरापूर्वी चुरशीचा झाला त्यानंतर मात्र पालघर संघाने 38-26 अशी बाजी मारली. प्रतिक जाधव विजयाचा शिल्पकार ठरला. तर अभिनय सिंग ने उत्कृष्ट पकडी करत हाय फाय पूर्ण केला. (Round of 5 teams in Group ‘B’ to qualify for the promotion round)
संक्षिप्त निकाल-
सातारा जिल्हा 15 – नाशिक जिल्हा 52
कोल्हापूर जिल्हा 52 – नंदुरबार जिल्हा 14
धाराशिव जिल्हा 18 – सांगली जिल्हा 61
लातुर जिल्हा 26 – पालघर जिल्हा 38
महत्वाच्या बातम्या –
कोल्हापूर संघाने नंदुरबार संघाचा विजयी रथ रोखला
चौथ्या विजयासह सांगली संघाची गुणतालिकेत अव्वल