ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषकात दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडीज क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. वेस्ट इंडीजला नेदरलँड्स व पराभूत व्हावे लागल्याने विश्वचषकाच्या पात्रता फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते. या पराभवानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून निकोलस पूरन याची संघाच्या कर्णधार पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिज संघ अपेक्षाप्रमाणे कामगिरी करू शकला नव्हता. 2012 व 2016 टी20 विश्वचषकाचे विजेते असलेल्या संघाला पात्रता फेरीचा अडथळा देखील पार करता आला नाही. त्यामुळे केवळ वेस्ट इंडीजच नव्हेतर जगभरातील चाहत्यांची निराशा झालेली. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने देखील याची गंभीर दखल घेतली आहे.
वेस्ट इंडीज संघाच्या खराब कामगिरीनंतर बोर्डाने या कामगिरीची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. यामध्ये वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा, संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक मिकी आर्थर व एका वरिष्ठ न्यायमूर्तींचा समावेश आहे. हे तिघे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून बोर्डाला एक अहवाल देतील.
एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, संघाच्या खराब कामगिरीचे खापर सर्वात पहिल्यांदा कर्णधार निकोलस पूरन याच्यावर फोडले जाऊ शकते. सहा महिन्यापूर्वी त्याच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली गेली होती. मात्र, यादरम्यान तो संघाला एकही मोठा मानला जाणारा विजय मिळवून देऊ शकला नाही. तसेच त्याची स्वतःची कामगिरी देखील अतिशय खराब झाली. त्याच्या जागी नवा कर्णधार म्हणून अष्टपैलू रॉवमन पॉवेलची नियुक्ती होऊ शकते.
टी20 क्रिकेटमचा प्रसिद्ध खेळाडू असलेला पॉवेल कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका थयावाजचे नेतृत्व करतो. तसेच, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व तो करत असतो.
(Rovman Powell Might Replace Nicholas Pooran As West Indies T20 Captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतची जागा घेण्यासाठी सज्ज झाला ‘हा’ यष्टीरक्षक, सलग 5 शतकांचा पाऊस पाडत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटर निवृत्त, भावनेच्या भरात केलेलं वक्तव्य वेधतंय लक्ष