पुणे। बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या आदिती रॉय हिने तर, मुलांच्या गटात अयान शेट्टी, बलवीर सिंग, अभिराम निलाखे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत आदिती रॉय हिने कर्नाटकाच्या अव्वल मानांकित श्रीया साई जेएसचा 6-2, 6-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. दिल्लीच्या अर्शिन सप्पलने महाराष्ट्राच्या क्षीरीन वाकलकरचा 6-0, 6-0 असा सहज पराभव केला.
मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अयान शेट्टी याने पाचव्या मानांकित देव तुराकियाचा 4-6, 6-3, 6-1 असा, तर बलवीर सिंग याने मध्यप्रदेशच्या तिसऱ्या मानांकित अनिकेत चौबेचा 6-1, 6-1 पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अभिराम निलाखे याने आठव्या मानांकीत राघव अमीनचे आव्हान 4-6, 6-3, 7-5 असे संपुष्टात आणले.
निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुले:
लक्ष्य गुजराथी(महा)[1] वि.वि.विश्वजीत सणस(महा)6-4, 5-7, 7-5;
ओमकार शिंदे(महा)वि.वि.मनन अगरवाल(महा) 6-2, 6-3;
अवनीश चाफळे(महा)वि.वि.अर्चित धूत(महा)6-3, 7-6(5);
आकांश सुब्रमणियम(गुजरात)[4] वि.वि.आरव सप्पल(दिल्ली)6-2, 6-0;
अमोघ दामले(महा)वि.वि.एम सिद्धार्थ रेड्डी(तामिळनाडू)6-0, 6-1
तेज ओक(महा)वि.वि.अहान शेट्टी(महा)7-5, 6-4;
अयान शेट्टी(महा)वि.वि.देव तुराकिया(महा)[5] 4-6, 6-3, 6-1;
अर्जुन किर्तने(महा)वि.वि.आदित्य आयंगर(महा)6-3, 6-2;
बलवीर सिंग वि.वि.अनिकेत चौबे(मध्यप्रदेश)[3] 6-1, 6-1;
अभिराम निलाखे(महा)वि.वि.राघव अमीन(महा)[8] 4-6, 6-3, 7-5;
मुली:
आदिती रॉय(महा)वि.वि.श्रीया साई जेएस(कर्नाटक)[1] 6-2, 6-2;
अर्शिन सप्पल(दिल्ली)वि.वि.क्षीरीन वाकलकर(महा)6-0, 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा डिविलियर्सच दिनेश कार्तिकचे ३६० डिग्री खेळाडू म्हणत करतो कौतुक, वाचा काय म्हणाला
जेसन होल्डरने रोखलं मॅक्सवेलचं वादळ, सुपरमॅन बनत हवेत घेतला जबराट कॅच; Video पाहाच
हेच बाकी होतं!! विराटने मोडली स्वत:चीच ४ वर्षांची परंपरा, लखनऊविरुद्ध झाला ‘गोल्डन डक’