---Advertisement---

RCB महिला संघाला मिळाला नवीन मुख्य प्रशिक्षक, आख्ख्या करिअरमध्ये खेळलाय फक्त 5 सामने

RCB-Women
---Advertisement---

महिला प्रीमिअर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम 2023मध्ये खेळला गेला होता. या लीगला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. मात्र, या हंगामात चाहत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या महिला संघाचा प्रवास खास राहिला नव्हता. स्टार खेळाडूंचा भरणा असूनही संघ अंतिम सामन्यातही पोहोचू शकला नव्हता. अशात 2024 महिला प्रीमिअर लीगपूर्वी आरसीबीने मोठे बदल केले आहेत. खरं तर, संघाने आपला मुख्य प्रशिक्षक बेन सॉयर याला पदावरून काढले असून त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा 43 वर्षीय माजी खेळाडू ल्यूक विलियम्स याला नवीन मुख्य प्रशिक्षक बनवले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती देत सांगितले की, “ल्यूक विलियम्स आरसीबी महिला संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून जोडला गेला आहे.” संघाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर ल्यूकने आनंदही व्यक्त केला आहे. त्याने म्हटले आहे की, “मी संघाशी जोडण्यासाठी खूपच उत्सुक आहे.”

https://twitter.com/RCBTweets/status/1707994050572472493?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1707994050572472493%7Ctwgr%5E0bf433d8910579223443460709483b0244a95edd%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Frcb-appoints-luke-williams-as-their-news-head-coach-for-wpl-2024

खरं तर, ऍडलेड येथे जन्मलेल्या या ल्यूक विलियम्स (Luke Williams) याने दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून 5 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ल्यूकने प्रशिक्षण क्षेत्रात चांगली लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखालीच महिला बिग बॅश लीगमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्स संघाने 2022-23चा किताब आपल्या नावावर केला होता. ते मागील 4 वर्षांपासून संघाशी जोडले गेले आहेत. यापैकी 2 वेळा संघ महिला बिग बॅश लीगचा उपविजेताही राहिला आहे.

बिग बॅश लीगव्यतिरिक्त ल्यूकच्या प्रशिक्षणाखाली महिला हंड्रेड स्पर्धेत साऊदर्न ब्रेव्ह संघाने किताबही जिंकला होता. ल्यूक या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक होता. अशात त्याचा हा अनुभव पाहता अपेक्षा केली जात आहे की, आरसीबी संघ 2024चा किताब आपल्या नावावर करेल.

विशेष म्हणजे, आरसीबी महिला संघाने (RCB Women Team) 2023 हंगामात खूपच खराब कामगिरी केली होती. त्यांनी स्पर्धेतील 8 सामने खेळले होते. त्यात त्यांना फक्त 2 सामने जिंकण्यात यश आले होते. 5 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत त्यांचा प्रवास चौथ्या क्रमांकावर संपला होता. (royal challengers bangalore appoints big bash winner luke williams as RCB wpl head coach)

हेही वाचा-
रोहितच्या विस्फोटक फलंदाजीची ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या मनात दहशत, म्हणाला, ‘तो तुमच्याविरुद्ध 20-24…’
विश्वचषकाच्या 5 दिवसांआधी युवराजची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ संघ खेळणार सेमीफायनल, एक नाव हैराण करणारे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---