---Advertisement---

आरसीबीचा विजयी ‘चौकार’, रोहित-गंभीरला न जमलेलं कोहलीने करुन दाखवलं

---Advertisement---

गेल्या १३ हंगामात आयपीएलचे एकही जेतेपद आपल्या नावे करण्यास अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुरुवारी (२२ एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने राजस्थान रॉयल्स संघाला १० गडी राखून पराभूत केले आहे. हा विजय मिळवल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा गुणतालिकेत पहिले स्थान गाठले आहे. यासोबतच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएलच्या इतिहासातील एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे.

राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या, कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक तर देवदत्त पडीक्कलने शतक झळकावत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवून दिला आहे. यासोबतच कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएलच्या इतिहासात सुरुवातीच्या सलग ४ सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाच्या यादीत पाचवा क्रमांक मिळवला आहे.

आजवर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स आणि गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघालाही कधी हा किर्तीमान करता आला नाही. परंतु हा कारनामा चेन्नई सुपर किंग्ज, डेक्कन चार्जर्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांनी केला होता.

आयपीएलच्या इतिहासात सुरुवातीचे सलग ४ सामने जिंकणारे संघ
१) चेन्नई सुपर किंग्ज : एमएस धोनी ( २००८)
२) डेक्कन चार्जर्स : ऍडम गिलख्रिस्ट (२००९)
३) किंग्ज इलेव्हेन पंजाब : जॉर्ज बेली (२०१४)
४) राजस्थान रॉयल्स : शेन वॉटसन (२०१५)
५) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : विराट कोहली (२०२१)

राजस्थान रॉयल्स संघाला १७७ धावा करण्यात आले यश
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून शिवम दुबेने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. यात त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावले. तसेच तेवतीयाने देखील ४० धावांची खेळी केली होती. यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले होते. २० षटक अखेर राजस्थान रॉयल्स संघाला १७७ धावा करण्यात यश आले होते.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सहजरित्या जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स संघाने दिलेल्या १७८ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १० गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयात विराट कोहलीने अर्धशतक झळकावत ७२ धावा आणि देवदत्त पडीक्कलने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत नाबाद १०१ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

जेंटलमन्स गेम! लाईव्ह सामन्यात जोस बटलरचं मनाला भावणारं कृत्य, एकदा व्हिडिओ पाहाच

शतकाजवळ पोहोचल्यानंतर पडीक्कलने कोहलीला म्हटले होते असे काही, वाचून करालं कौतुक

संघ-सहकाऱ्यासोबत धावांचे दीडशतक पार करण्यात कोहली माहीर, कोणालाही न जमलेल्या किर्तीमानाची केली नोंद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---