इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे (आयपीएल २०२२) बिगूल वाजले असून हा हंगाम केवळ २ आठवड्यांवर आला आहे. २६ मार्चपासून आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) ताफ्यातून मोठी बातमी पुढे येत आहे. शनिवार रोजी (१२ मार्च) बेंगलोरने त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा (RCB New Captain) केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) याची बेंगलोरच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. तो बेंगलोर संघाचे नेतृत्त्व करणारा सातवा कर्णधार असेल. (Royal Challengers Bangalore Franchise Officially Announced New Captain)
आयपीएल २०२१ नंतर विराट कोहली याने बेंगलोर संघाचे नेतृत्त्वपद सोडले होते. त्यामुळे येत्या २०२२ च्या हंगामात बेंगलोरचा संघ नव्या कर्णधाराच्या शोधात होता. मात्र मेगा लिलावात बेंगलोरने ७ कोटींची रक्कम खर्च करत डू प्लेसिसला विकत घेतले होते. त्यानंतर हा दिग्गज क्रिकेटपटूच विराटचा उत्तराधिकारी ठरेल अशी चर्चा होती. आता बेंगलोर संघाने ट्वीटर अकाउंटद्वारे यासंदर्भात अधिकृत घोषणाही केली आहे.
https://twitter.com/RCBTweets/status/1502603973848494087?s=20&t=zwT-9RJeO7WCj0MbjflJ4g
फाफ डू प्लेसिस बेंगलोरचा सातवा कर्णधार
डू प्लेसिस आता २७ मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबईच्या मैदानातून बेंगलोरच्या नेतृत्त्वाची सूत्रे सांभाळेल. तो बेंगलोर संघाचे नेतृत्त्व करणारा सातवा कर्णधार असेल. त्याच्यापूर्वी विराट कोहली, शेन वॉटसन, डॅनियल व्हिटोरी, अनिल कुंबळे, केविन पीटरसन आणि राहुल द्रविड यांनी बेंगलोर संघाचे नेतृत्त्व केले आहे. यातील विराटने सर्वाधिक तब्बल १० हंगाम (२०११ ते २०२१) बेंगलोर संघाचे नेतृत्त्व केले आहे.
https://twitter.com/RCBTweets/status/1502606075198988292?s=20&t=T8-zfIVfrzT9qudTaR4X9w
माजी कर्णधार विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया
३७ वर्षीय डू प्लेसिसची बेंगलोरच्या नेतृत्त्वपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी कर्णधार विराटने प्रतिक्रिया दिली आहे. मागील इतके वर्षे जी जबाबदारी माझ्या खांद्यावर होती, ती आता फाफ डू प्लेसिसला सोपवून मी आनंदी आहे. तो माझ्या चांगल्या आणि जवळच्या मित्रांपैकी एक आहे. आमच्यात केवळ मैदानावरचेच नाही तर मैदानाबाहेरचेही नाते आहे. मी त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यासाठी उत्साहित आहे, असे विराटने म्हटले आहे. बेंगलोर संघाने त्याच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘टीम इंडिया’ करणार पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना? ‘हे’ आहे कारण
त्याच्या संघात आल्याने वाढली ताकद; बुमराहने ‘या’ खेळाडूच्या पुनरागमनाबद्दल व्यक्त केला आनंद
धक्कादायक..! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची मुलगी पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली