---Advertisement---

प्ले-ऑफच्या शर्यतीसाठी राजस्थान अन् बेंगलोर आमने-सामने; संजूच्या बालेकिल्ल्यात फाफसेना करणार बॅटिंग

On: रविवार, मे 14, 2023 3:08 PM
Virat-Kohli-And-Faf-Du-Plessis
---Advertisement---

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअम येथे आयपीएल 2023 स्पर्धेतील 60वा सामना राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात रविवारी (दि. 14 मे) पार पडणार आहे. या सामन्याला दुपारी 3.30वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी राजस्थान विरुद्ध बेंगलोर संघात 3 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने जिंकली. तसेच, त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकत दोन्ही संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न करतील.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात दोन बदल आहेत. जोश हेजलवूडच्या जागी वेन पार्नेलची संघात एन्ट्री झाली आहे, तर वनिंदू हसरंगा याच्या जागी मायकल ब्रेसवेल संघात सामील झाला आहे. राजस्थान रॉयल्स संघात एक बदल झाला आहे. ट्रेंट बोल्ट याच्या जागी ऍडम झम्पा याची संघात एन्ट्री झाली आहे.

राजस्थान आणि बेंगलोरची आयपीएल 2023मधील कामगिरी
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर ते 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. त्यांनी 12 सामने खेळताना 6 सामने जिंकले आहेत, तर उर्वरित 6 सामन्यावर संघाला पाणी सोडावे लागले आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाविषयी बोलायचं झालं, तर ते 10 गुणांसह सातव्या स्थानी आहेत. त्यांनी आतापर्यंत 11 सामने खेळताना 5 सामन्यता विजय, तर उर्वरित 6 सामन्यात पराभव पत्करला आहे. अशात दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे.

आयपीएल 2023च्या 60व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, ऍडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मायकल ब्रेसवेल, वेन पार्नेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! लाईव्ह सामन्यात लखनऊच्या कोचकडून लज्जास्पद कृत्य, काय केलंय तुम्हीच पाहा
झिम्बाब्वेचे माजी कर्णधार स्टेज 4च्या कॅन्सरने ग्रस्त; प्रार्थना करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांची चाहत्यांकडे मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---