2025चा आयपीएल (Indian Premier League) हंगाम खूप रोमांचक पाहायला मिळणार आहे. पण आगामी हंगामापूर्वी मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. अशा स्थितीत अनेक खेळाडू एका संघातून दुसऱ्या संघात जाऊ शकतात. मेगा लिलावापूर्वी सर्व संघांना त्यांच्या संबंधित सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. याआधी आरसीबी कॅम्पमधून मोठी बातमी समोर आली आहे. म्हटले जात आहे की, आरसीबी फाफ डू प्लेसिस, स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरन ग्रीन यांना सोडू शकते.
आयपीएलच्या नियमांनुसार, मेगा लिलावापूर्वी सर्व संघांना फक्त 4 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी होती. मात्र यावेळी खेळाडूंना कायम ठेवण्याची संख्या वाढणार असल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2025 साठी, सर्व संघ 4 ऐवजी 6 खेळाडूंना कायम ठेवू शकतात. अशा परिस्थितीत आरसीबी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवू शकते?
फाफ डू प्लेसिसनं (Faf Du Plessis) फार पूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता फार कमी क्रिकेट खेळतो. अशा परिस्थितीत त्याचं वय लक्षात घेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) त्याला आगामी हंगामापूर्वी सोडू शकते. गेल्या हंगामात ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी निराशाजनक होती. आयपीएल 2024 मध्ये मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) खूप खराब प्रदर्शन केलं होतं. आयपीएल 2024 पूर्वी आरसीबीनं मुंबई इंडियन्ससोबत कॅमरन ग्रीनचा (Cameron Green) व्यवहार केला होता. शेवटच्या हंगामात ग्रीन अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकला नाही.
रिपोर्ट्सनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विराट कोहली (Virat Kohli), विल जॅक्स (Will Jacks), रजत पाटीदार (Rajat Patidar), मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजय कुमार वैशाख यांना आयपीएल 2025 साठी कायम ठेवणार आहे. मात्र, केवळ 4 खेळाडूंनाच कायम ठेवण्याची परवानगी दिल्यास कोहली, पाटीदार, सिराज आणि यश दयाल यांना कायम ठेवू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीमध्ये पुनरागमन करण्यासाठी पंतला द्यावी लागणार अग्नीपरिक्षा, ‘या’ देशांतर्गत स्पर्धेत मिळणार टक्कर
“दोन चार कपडे काढले असते तर वजन…”, विनेश फोगटबद्दल भाजप नेत्याची संतापजनक पोस्ट
‘हा’ दिग्गज खेळाडू 12 वर्षांनंतर प्रथमच खेळणार देशांतर्गत क्रिकेट!