न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसनने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्व पद्धतीवरुन, त्याच्या क्रिकेटप्रती असलेल्या विचारसरणीची ओळख पटत असल्याचे सांगितले आहे. तसेच भारतातील कमी गतीच्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजीसाठी वेगवेगळी कौशल्ये आवश्यक असली पाहिजेत असेही त्याचे म्हणणे आहे.
सहा फूट आठ इंच उंचीच्या या खेळाडूने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयपीएल २०२१च्या दोन सामन्यांत गोलंदाजी केली आहे. यादरम्यान एका सामन्यात 30 धावा देऊन 1 बळी तर दुसऱ्या सामन्यांत 27 धावा देऊन 1 बळी अशी कामगिरी केली आहे.
तो म्हणाला की, “कोहली हा एक अनुभवी आणि कुशल असा कर्णधार असून त्याची खेळातील प्रगती नक्कीच माझ्या विचारसरणीचे समर्थन करत असते. तो स्पर्धात्मक आणि आक्रमक असून त्याला आव्हान स्वीकारायला आवडते. त्याच्या याच गोष्टीचे मला अनुसरण करायला आवडेल,”
आज (१८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणाऱ्या तिसर्या सामन्यापूर्वी या वेगवान गोलंदाजाने म्हटले आहे की, “भारतीय खेळपट्टीवर गोलंदाजी करताना वेगवेगळी कौशल्ये असणे आवश्यक आहे.”
न्यूझीलंडकडून आठ टी-20, पाच एकदिवसीय आणि सहा कसोटी सामने खेळणार्या या खेळाडूने सांगितले की, “येथील खेळपट्टी न्यूझीलंडपेक्षा खूप वेगळी आहे. न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर थोडेसे गवत असते. परंतु पहिल्या दोन सामन्यामध्ये येथील खेळपट्टी कमी गतीची असल्याचे जाणवले. परंतु हे एक चांगले आव्हान असून मी त्याचा आनंद घेत आहे.”
प्रथमच भारतात आलेल्या जेमीसनने सांगितले की, “सध्या मी इथे अनुभव घेत असून ते माझ्यासाठी खूप चांगले झाले आहे. मी प्रथमच भारतात आलो आहे. क्वारंटाईनंतर सराव करणे आणि नंतर सामना खेळणे हे खूप चांगले आहे. न्यूझीलंडपेक्षा हे थोडे वेगळे आणि अवघड आहे परंतु यातून मी अनुभव घेत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिकचा मोठा खुलासा, ‘या’ कारणामुळे गतवर्षी अर्ध्यातच सोडले होते केकेआरचे कर्णधारपद