येत्या ९ एप्रिल पासून इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा थरार रंगणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांनी कसून सरावाला सुरुवात देखील केली आहे. मात्र आयपीएल सुरू होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएल हंगामात आरसीबी संघासाठी यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडणारा खेळाडू संघाबाहेर झाला आहे.
आयपीएल २०२०च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून ५ सामने खेळत ७८ धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज जोश फिलिप याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल मधून माघार घेतली आहे. त्याच्या ऐवजी न्यूझीलंड संघाचा २१ वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज फिन एलन याला २० लाखाच्या मूळ किमतीत संघात समाविष्ट केले आहे.
याबाबतची माहिती आरसीबी संघाने ट्विट करत दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहले आहे की, “आम्हाला सांगण्यात दुःख होत आहे की, जोश फिलिप २०२१ साठी वैयक्तिक कारणास्तव उपलब्ध नसणार आहे. याच कारणामुळे आम्ही न्यूझीलंड संघाचा शीर्ष क्रमातील फलंदाज फिन एलन याला संघात संधी देत आहोत.”
काय आहेत आरसीबीकडे पर्याय?
आरसीबी संघाकडून येणाऱ्या हंगामात जोश फिलिप यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडणार होता. परंतु त्याने माघार घेतल्यामुळे ही भूमिका फिन एलन पार पाडू शकतो. तसेच आरसीबी संघाकडे एबी डिविलियर्स सारखा यष्टिरक्षक फलंदाज उपलब्ध आहे. परंतु २१ वर्षीय फिन एलनने नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड मधील देशांतर्गत स्पर्धेत ११ सामन्यात ५६.९च्या सरासरीने ५१२ धावा केल्या आहेत. त्यामुळे आरसीबी संघाला आक्रमक फलंदाज आणि यष्टिरक्षक हवा असेल तर ते एलनला नक्कीच संधी देतील.
महत्वाच्या बातम्या:
रिषभ पंत नव्हे तर, या खेळाडूला पहिल्या टी२० सामन्यात कोहली देणार यष्टीरक्षक म्हणून संधी
आयसीसी मधील भारतीय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज