---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नवे अँथम साँग ऐकले का? यंदा काय आहे विशेष पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, एप्रिल 9, 2021 6:25 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेचा थरार आजपासून (९ एप्रिल ) रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिली लढत,आयपीएलच्या इतिहासात पाच वेळेस जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएलचे पहिले जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांमध्ये रंगणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी दोन्हीही संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत.

यंदाही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आयपीएल २०२१ हंगामासाठी आपले नवीन अँथम साँग रिलीज केले आहे.

मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल इतिहासात सर्वाधिक ५ वेळेस आयपीएल जेतेपद पटकावले आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला गेल्या १३ हंगामात एकही जेतेपद पटकावण्यात यश आले नाहीये. त्यामुळे येणाऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ नव्या जल्लोषात मैदानात उतरणार आहे.

त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आगामी हंगामासाठी अँथम साँग रिलीज केले आहे. ज्यामध्ये कर्णधार विराट कोहलीसह संघातील इतर खेळाडू देखील दिसून येत आहे. तसेच या आरसीबीने या अँथम साँगबद्दल म्हटले आहे की नव्या हंगामासाठी नव्या इच्छाशक्तीसह तयार आहोत. या साँगवर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत.

गतवर्षी युएई मध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु या वेळेस देखील प्लेऑफ मध्ये स्थान मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला एलिमिनेटर च्या सामन्यात हैदराबाद संघाने पराभूत केले होते.यापूर्वी देखील हैदराबाद संघाने २०१६ मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत करत आयपीएलचे जेतेपद पटकावले होते.

यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ मजबूत संघ दिसून येत आहे. कर्णधार विराट कोहली आणि एबी डिविलियर्ससारख्या दिग्गज खेळाडूंनी भरलेल्या संघात ग्लेन मॅक्सवेल आणि काईल जेमिसन यांसारख्या खेळाडूंची भर पडली आहे. त्यामुळे हा संघ आणखी मजबूत झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर संघाच्या चिंतेत वाढ, ‘हे’ आहे कारण

जेव्हा बॉलिवुडचा सिंबा घेतो अजिंक्य रहाणेची भेट, मग पुढे काय झाले तुम्हीच पाहा

पहिल्याच सामन्यात रोहित-विराटसह मुंबई आणि बेंगलोरचे ‘हे’ खेळाडू घालू शकतात मोठ्या विक्रमांना गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---