जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना सोमवारी (२९ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेला हा सामना बरोबरीत सुटला होता. परंतु बेंगलोरने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला.
नाणेफेक जिंकून मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने ५ विकेट्स गमावत २०१ धावा केल्या. बेंगलोरने दिलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाने २० षटकात ३ बाद २०१ धावा केल्या. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने १ विकेट गमावत ७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बेंगलोरने १० धावा करत हा सामना आपल्या नावावर केला.
यापूर्वी मुंबईकडून फलंदाजी करताना इशान किशनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकार ठोकत ९९ धावांची तूफानी खेळी केली. तर कायरन पोलार्डनेही २४ चेंडूत नाबाद ६० धावा ठोकल्या. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या इतर कोणत्याही फलंदाजाला २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत.
बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना इसुरु उडानाने सर्वाधिक २ विकेट्स चटकावल्या. ४ षटकात ४५ धावा देत त्याने हा कारनामा केला. तर वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजीस उतरलेल्या बेंगलोरचे सलामीवीर फलंदाज देवदत्त पड्डीकल आणि ऍरॉन फिंच यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पड्डीकलने ४० चेंडूत ५४ धावा केल्या. तर फिंचने ३५ चेंडूत ५२ धावा ठोकल्या. तसेच, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या एबी डिविलियर्सने नाबाद राहत २४ चेंडूत सर्वाधिक ५५ धावा कुटल्या. यात त्याच्या ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेनेही अंतिम षटकात डिविलियर्सला चांगली साथ देत २७ धावांचे योगदान दिले.
मुंबई संघाकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्टने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. ४ षटकात ३४ धावा देत त्याने हा पराक्रम केला. तर राहुल चाहरनेही बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची एकमेव विकेट मिळवली. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक ठोकत ‘या’ खेळाडूची महान खेळाडूंच्या यादीत एन्ट्री
-दुर्दैव! आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारे ‘ते’ ५ कमनशिबी क्रिकेटर
-विराट- रोहितमधील खुन्नस कायम! पाहा कोण पडलंय कुणाला भारी?
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०मध्ये विक्रमांचा पाऊस, जाणून घ्या किती आणि कोणते झालेत विक्रम
-३ सलामीवीर जे या आयपीएल हंगामात करु शकतात खालच्या क्रमांकावर फलंदाजी
-जेसन होल्डर ४ वर्षांनी उतरणार आयपीएलच्या मैदानात, जाणून घ्या त्याच्याबद्दल ३ खास गोष्टी