इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सगळ्या संघांची जोरदार तयारी सुरू आहे. सर्व संघ आता यूएईला रवाना होण्याच्या तयारीत आहे. यादरम्यानच आपला विलीनीकरणाचा काळ पूर्ण करून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) संघ रविवारी (२९ ऑगस्ट) यूएईला रवाना होत आहे.
यादरम्यान आरसीबीने विलीनीकरणाच्या काळात आपल्या खेळाडूंचे अनेक फोटो ट्विटरवरून शेअर केले होते. तसेच आरसीबीचा शनिवारी (२८ ऑगस्ट) विलीनीकरणाचा काळ संपला. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आरसीबीचा संघ यूएईला रवाना होणार आहे. तिथे गेल्यावरही कोरोनाच्या नियमानुसार सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा ६ दिवसाच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. यानंतरच सर्व खेळाडूंना सरावासाठी परवानगी मिळणार आहे.
#TravelDay ft. Royal Challengers. 🇮🇳 ✈️ 🇦🇪
The team has reached UAE and will quarantine for 6️⃣ days before starting preparations for the second half of #IPL2021. 👊🏻#PlayBold #WeAreChallengers pic.twitter.com/QoJZXhNqbX
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 29, 2021
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आरसीबीमध्ये होणार बदल
दरम्यान, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वीच अनेक खेळाडूंनी आयपीएलमधून नाव मागे घेतले होते. तसेच आरसीबीच्याही काही खेळाडूंनी दुसरा टप्प्यातून आपले नाव मागे घेतले होते. ज्यामध्ये न्यूझीलंडचा फिन ऍलन आणि स्कॉट कुग्गेलेईजन यांनी बांगलादेश विरुद्ध होणार या मालिकेमुळे नाव मागे घेतले होते. तर ॲडम झाम्पा, डॅनियल सॅम्स आणि केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारणामुळे उर्वरित आयपीएलमधून माघार घेतली होती.
या खेळाडूंऐवजी आरसीबीने श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदु हसरंगा, वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा आणि सिंगापूरचा विस्फोटक फलंदाज टीम डेविडला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संघात सामील केले आहे. तसेच आरसीबीचे प्रशिक्षक सायमन कॅटीच यांनी देखील काही वैयक्तिक कारणांमुळे आरसीबीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांच्या जागी आरसीबीने माईक हेसन यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.
आरसीबीने आयपीएलसाठी आपला पूर्ण संघ घोषित केला आहे. तसेच यूएईला रवाना होण्यापूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो देखील शेअर केला आहे.
The RCB family en route UAE! ✈️ 🇦🇪
Bring on #IPL2021 👊🏼. #PlayBold #WeAreChallengers #TravelDay pic.twitter.com/Is3Ve3M2Pr
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 29, 2021
आरसीबीच्या यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली सुरुवात राहिली आहे. भारतात खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये आरसीबीने ७ सामन्यांमध्ये ५ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे १० गुणांसह आरसीबीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, आयपीएल २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ याआधीच यूएईला रवाना झाले आहेत. तसेच विलीनीकरणाचा कार्यकाळ संपवून दोन्ही संघांनी सराव सत्राला देखील सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–चौथी कसोटी ओव्हलमध्ये! भारतीय संघाची आणि खेळाडूंची या मैदानावर राहिलीये ‘अशी’ कामगिरी
–भारतीय संघाच्या ‘मिस्ट्री स्पिनर’ने केले आहे ‘या’ चित्रपटात काम
–सात प्रकारे गोलंदाजी करणारा ‘आर्किटेक्ट’; वाचा गोलंदाज वरुणची ‘चक्रवर्ती’ कहाणी