---Advertisement---

आधारस्तंभ हरपला! माजी भारतीय गोलंदाजाचे वडिल कालवश, त्यांच्यासाठी अर्ध्यातून सोडली होती आयपीएल

On: बुधवार, मे 12, 2021 3:08 PM
---Advertisement---

सध्या संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या महामारीमुळे आजवर कित्येकांच्या कुटुबीयांनी आपल्या जवळच्या सदस्यांना गमावले आहे. मागील आठवड्यात भारतीय संघातील बऱ्याच क्रिकेटपटूंच्या कुटुबांतील सदस्यांचेही या महामारीमुळे निधन झाले आहे. आज (१२ मे) भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग याचे वडिल शिव प्रसाद सिंग कोरोनामुळे कालवश झाले आहेत.

दुर्दैवाची बाब म्हणजे, काही दिवसांपुर्वीच आरपी सिंगने आपल्या कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या वडिलांसाठी आयपीएल २०२१ मधून माघार घेतली होती. परंतु आता त्याच वडिलांनी त्याची साथ सोडली आहे. लखनऊमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. परंतु कोरोनाची बाधा झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता. शेवटी आज दुपारी मेदांता रुग्णालयातच त्यांचे निधन झाले.

याबाबत आरपी सिंगने आपल्या ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे की, ‘माझे वडील शिव प्रसाद सिंग यांचे निधन झाले असल्याचे वृत्त कळवताना खूप दु:ख होत आहे. कोरोनाचा सामना करताना १२ मे रोजी ते स्वर्गवासी झाले. माझ्या दिवंगत वडिलांसाठी सर्वांनी प्रार्थना करावी, अशी विनंती करतो.’

वडिलांसाठी सोडले होते आयपीएल
जगातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे २९ सामने झाल्यानंतर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. या स्पर्धेचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स समूहाकडून केले जात होते. त्याच्या हिंदी समालोचन गटाचा भाग असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग हा आयपीएल अर्ध्यात सोडून आपल्या घरी परतला होता.

आरपी सिंगच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी व कुटुंबासोबत राहण्यासाठी आरपी सिंगने समालोचकांच्या बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भावा पँट तरी घालायची’ म्हणत मुंबईच्या सलामीवीराने कार्तिकला केले ट्रोल, मग त्यानेही ‘असे’ दिले प्रत्युत्तर

टीम इंडिया सज्ज, ‘हे’ आहेत कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा चोपणारे ३ भारतीय फलंदाज

कसोटी चॅम्पियनशीप: विराट वगळता भारताचे इतर फलंदाज इंग्लंडमध्ये ठरलेत फेल! रोहितच्या नावे फक्त ३४ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---