भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबतच्या आपल्या मैत्रीविषयी मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की, “माझी आणि धोनीची आधी खूप चांगली मैत्री होती. पण, आमच्या मैत्रीमुळे त्याला संघ निवडताना कधीही फरक पडला नाही. कारण धोनी कधीही कोणत्या खेळाडूची बाजू घेत नाही.” Rp singh talks about his friendship with ms dhoni.
पाठीमागे आलेल्या एका वृत्तानुसार, २००८मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात धोनीने म्हटले होते की, जर आरपीच्या जागी इरफान पठाणला संघात स्थान देण्यात आले तर तो त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा देईल. त्या घटनेच्या १२ वर्षांनंतर आरपीने ते सर्व काही खोटे असल्याचा दावा केला आहे. धोनी कोणाचीही बाजू घेत नव्हता, असे त्याने यावेळी सांगितले आहे.
स्पोर्ट्स तकशी बोलताना आरपीने या गोष्टीचा उलगडा केला आहे. तो म्हणाला की, “आम्ही बोलताना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची चर्चा सुरु होती. त्या मालिकेपुर्वीच्या इंदोरमधील सामन्यात मला एकही विकेट घेता आली नव्हती. निश्चितपणे प्रत्येकाला वाटते की त्याला २-३ संधी मिळायला पाहिजेत. काही खेळाडूंना ५ वेळा संधी मिळते आणि काही भाग्यशाली खेळाडूंना तर १० वेळादेखील संधी मिळते. पण, कदाचित माझ्या नशिबात ते नव्हते.”
आरपी पुढे म्हणाला की, “मला बऱ्याचदा नुकसान झेलावे लागले. काही वेळेला तर मी खराब प्रदर्शन केल्यामुळे मला थेट देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी पाठवले जात होते. काही खेळाडू नशिबवान असतात. खराब प्रदर्शन करुनही त्यांना संघातून बाहेर काढले जात नाही, त्यामुळे त्यांना अजून चांगला सराव करण्याची संधी मिळते. जर, तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी गेलात तर तिथे आंतरराष्ट्रीय स्तराप्रमाणे आव्हानात्मक खेळ अनुभवायला मिळत नाही.”
“क्रिकेटबाबतीत धोनी कधीही कोणाची बाजू घेत नाही आणि त्याच्या या स्वभावामुळेच तो आज इथपर्यंत पोहोचला आहे. मला तेवढे क्रिकेट खेळायला मिळाले नाही , जेवढे मी खेळायला पाहिजे होते. कदातीत यामुळेच माझा वेग कमी झाला आणि माझा चेंडू पुर्वीप्रमाणे स्विंगही होत नाही. जर मी माझ्या गोलंदाजीत सुधारणा केली असती, तर मी नक्कीच पुढे गेलो असतो. पण मी जेवढे काही मिळवले आहे तेवढ्यात मी आनंदी आहे,” असेही आरपीने बोलताना सांगितले.
ट्रेंडिंग घडामोडी-
बांगलादेशच्या माजी खेळाडूचा वसीम अक्रमवर गंभीर आरोप, म्हणतो त्याने माझ्या…
रोहितच्या २६४ धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता असलेले ५ खेळाडू






