---Advertisement---

“मोठ्या दुःखाने सांगावे लागत आहे की…”, आरपी सिंगने वडीलांच्या निधनानंतर लिहिला भावूक संदेश

On: शुक्रवार, मे 14, 2021 1:00 AM
---Advertisement---

माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि 2007 टी -20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला आरपी सिंग याच्या वडिलांचे काहीदिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे. आरपी सिंग याने स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. त्याचे वडील शिवप्रसाद सिंग हे बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर लखनऊच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते.

वडिलांच्या मृत्यूची माहिती देताना आरपीने ट्विटरवर लिहिले, “मोठ्या दुःखाने सांगावे लागत आहे की, माझे वडील शिवप्रसाद सिंग यांचे निधन झाले आहे. कोरोना संक्रमनामुळे माझे वडील 12 मे रोजी आम्हा सर्वांना सोडून गेले. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. ॐ नमः शिवाय.”

कोरोना व्हायरस सर्व भारतभरात हाहाकार माजवला आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबिय देखील अडकले आहे.  भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी लेगस्पिनर पीयूष चावला याचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे देखील दोन दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले होते. पीयूषचे वडील गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेला वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याच्या वडिलांचे देखील रविवारी कोरोनामुळे निधन झाले. अलीकडेच त्याचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच सकारियाच्या भावाने आत्महत्या केली होती. अशा प्रकारे सकारियाने 5 महिन्यांत आपल्या घरचे 2 सदस्य गमावले आहेत.

आरपी सिंग हा आयपीएल 2021 मध्ये हिंदी कॉमेन्ट्री पॅनलचा सदस्य होता. वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर आरपी सिंग आयपीएल सोडून आपल्या घरी गेला होता. आरपी सिंगने 2005 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये तर 2006 साली कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. आरपीने जवळजवळ 6 वर्षे भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय संघातील खेळाडू ‘या’ कारणामुळे लवकरच मुंबईत जमणार एकत्र

ईद मुबारक! भारतीय कर्णधार विराट कोहलीने ‘या’ संदेशासह देशवासीयांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

मुंबई इंडियन्सला पोलार्ड नावाचा हिरा ब्राव्होने दिलाय! त्याचीच ही कहाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---