---Advertisement---

धोनीच्या निवृत्तीबाबत संजू सॅमसनने व्यक्त केली ‘ही’ इच्छा..!

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2025 10:17 PM
---Advertisement---

आता आयपीएल 2025 सुरू होण्यास सुमारे 1 महिना शिल्लक आहे. हा हंगाम एमएस धोनीचा खेळाडू म्हणून शेवटचा हंगाम असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. धोनी लवकरच त्याच्या सरावाला सुरुवात करेल. काही दिवसांपूर्वी, एमएस धोनी आणि संजू सॅमसन मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात एकत्र दिसले. यादरम्यान संजूने धोनीबद्दल काही गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे त्याने सर्वांची मनं जिंकली.

एमएस धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने CSK ला 5 वेळा चॅम्पियन बनवले आहे.  2022 मध्ये त्याने रवींद्र जडेजाकडे संघाचे नेतृत्व सोपवले, पण खराब कामगिरीमुळे धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. 2024 पूर्वी, धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपद सोडले आणि ऋतुराज गायकवाडची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.  गेल्या 3-4 हंगामांपासून धोनीबद्दल तो या हंगामानंतर निवृत्त होईल, अशा चर्चा होत्या, पण तसे झाले नाही.

संजू सॅमसन आणि एमएस धोनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात पोहोचले होते. दोघेही एकाच मंचावर होते. यावेळी संजू सॅमसन म्हणाला, “मला माझ्या गुरू (एमएस धोनी) कडून खूप काही शिकायचे आहे. जेव्हा माही भाई आयपीएलमध्ये खेळायला येतो, तेव्हा लोक तो निवृत्त होणार आहे की नाही याबद्दल बोलतात? मला वाटते की आता नाही, त्याने आणखी थोडे खेळावे.”

धोनीची तंदुरुस्ती आणि वय यामुळे त्याला आयपीएलमधून निवृत्ती घ्यावी लागू शकते. त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. गेल्या काही हंगामात, धोनी खूप कमी चेंडू खेळण्यासाठी मैदानावर येतो, पण याच काळात चाहत्यांचा उत्साह सर्वाधिक असतो. गेल्या दोन आयपीएल हंगामात धोनीने फक्त 130 चेंडूंचा सामना केला.

हेही वाचा –
भारत-बांगलादेश भिडणार; सामन्यापूर्वीच धक्कादायक आकडेवारी समोर
फखर झमान सलामीला का आला नाही? ‘हे’ आहे कारण…
भारतीय संघ निवडीत मोठी चूक? दिनेश कार्तिकने केले प्रश्न उपस्थित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---