---Advertisement---

680 पैकी 610 धावा चौकार-षटकारांतून! वैभव सूर्यवंशी नेमका कोणत्या मातीचा बनलाय?

On: गुरूवार, मे 28, 2026 11:05 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटने वेगवेगळ्या काळात अनेक महान फलंदाज पाहिले आहेत. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यानंतर आता वैभव सूर्यवंशी या नव्या स्टारचा काळ सुरू झाल्याची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे. अवघ्या १५ वर्षांच्या या युवा फलंदाजाने आयपीएल २०२६ मध्ये आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो पुढील २० वर्षे क्रिकेट खेळला, तर अनेक विक्रम मोडीत निघतील, असे मत क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केले जात आहे.

आयपीएल २०२६ मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या वैभव सूर्यवंशीने ६८० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यातील तब्बल ६१० धावा त्याने चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या आहेत. वैभवने या हंगामात ५५ चौकार आणि तब्बल ६५ षटकार ठोकले आहेत. एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर जमा झाला आहे.

यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेल यांच्या नावावर होता. गेलने आयपीएल २०१२ मध्ये ५९ षटकारांसह ७३३ धावा केल्या होत्या. त्याच्या धावांपैकी ४८ टक्के धावा षटकारांमधून आल्या होत्या. मात्र, वैभवच्या ६८० धावांपैकी तब्बल ५७ टक्के धावा षटकारांमधून आल्या आहेत. त्यामुळे वैभवची फलंदाजी पाहता गेलचे विक्रमही आता छोटे वाटू लागले आहेत.

वैभवच्या वयावरून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. काही जण त्याचे वय १५ वर्षे असल्यावर विश्वास ठेवत नाहीत. मात्र, जगातील सर्वात कठीण आणि महागड्या टी-२० लीगमध्ये अनुभवी खेळाडू अपयशी ठरत असताना वैभवने दाखवलेला आत्मविश्वास आणि निर्भीड फलंदाजी सर्वांनाच प्रभावित करत आहे.

२७ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात वैभवने इतिहास घडवण्याची संधी जवळपास साधली होती. तो अवघ्या २८ चेंडूत ९७ धावांवर खेळत होता आणि आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतकापासून फक्त एका फटक्याने दूर होता. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. या तुफानी खेळीत त्याने १२ षटकार आणि ५ चौकारांसह २९ चेंडूत ९७ धावांची वादळी खेळी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---