गुरूवार (15 एप्रिल) रोजी झालेल्या आयपीएल 2021 च्या सातव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 गडी राखून पराभूत केले. या सामन्यादरम्यान दिल्ली संघाची फलंदाजी चालू असताना रियान परागने रिषभ पंतच्या रुपात संघाला मोठी विकेट मिळवून दिली. दिल्लीच्या कर्णधाराला धावबाद केल्यानंतर रियान आनंदाने मैदानात त्याचा आवडता बिहू डान्स करू लागला. त्याच्या या विशेष डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्यानंतर सामन्यातील 13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर धाव घेताना रियान परागने त्याला धावबाद केले. रिषभ पंत धावबाद होताच रियानने पुन्हा एकदा त्याचा आवडता बिहू डान्स सुरू केला. या अगोदरही बऱ्याचदा बिहू डान्स करताना दिसला होता.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1382720699979198466?s=20
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 8 गडी गमावत 147 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या राजस्थानच्या डावाची सुरुवात खराब झाली. राजस्थानचे पहिले पाच गडी अवघ्या 42 धावांत तंबूत परतले होते. त्यानंतरच पहिला सामना खेळत असलेल्या डेव्हिड मिलरने 62 धावा करून राजस्थानचा डाव सांभाळला. पण मिलर बाद झाल्यानंतर राजस्थान पुन्हा एकदा अडचणीत सापडला. परंतु यानंतर यंदाच्या हंगामात 16.5 कोटीला विकत घेतलेल्या ख्रिस मॉरिसने 4 षटकारांच्या मदतीने 18 चेंडूत 36 धावांची विलक्षणीय खेळी करून राजस्थानला विजय मिळवून दिला.
दिल्लीविरुद्ध झालेल्या राजस्थानच्या दुसर्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी दिल्ली संघाला 20 षटकांत केवळ 147 धावांवरती रोखले. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजस्थानच्या गोलंदाजांनी या सामन्यात एकही षटकार खाल्ला नाही. त्यामध्ये जयदेव उनादकटने 4 षटकांत केवळ 15 धावा देऊन 3 गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
भन्नाट! स्टॉयनिसला बाद करताना बटलरने पकडला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
अरेरे! विस्फोटक फलंदाज भरलेल्या दिल्ली कॅपिटल्सवर आली ‘ही’ नामुष्की, वानखेडे स्टेडियमवर…
रियान परागला मोलाचा सल्ला देताना विराट म्हणाला होता, ‘तू कधीही ऑरेंज कॅप जिंकू शकणार नाही, कारण…’






