---Advertisement---

बाबो! मोईन अलीचा ‘तो’ चौकार पडला पाच लाखाला, आता काय होणार एवढ्या पैशांचं?

On: शनिवार, मे 21, 2022 4:28 PM
Moeen-Ali
---Advertisement---

आयपीएल २०२२च्या ६८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांसोबत भिडले. राजस्थान रॉयल्सने हा सामना  ५ विकेट्स राखून जिंकला. सीएसकेला जरी पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी त्यांचा अष्टपैलू मोईन अलीने मैफील लुटली, पण शतकापासून अवघ्या ७ धावांच्या अंतरावर असताना रियान परागच्या हातात झेलबाद झाला. यादरम्यान मोईनने एक चौकार असा मारला, ज्याची किंमत पाच लाख रुपये होती.

टाटा ग्रुप इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे अधिकृत स्पॉन्सर्स आहेत. चालू हंगामातील प्रत्येक सामन्यात त्यांची नवीन गाडी ‘पंच’ मैदानात उभी असते. जर सामना सुरू असताना खेळपट्टीवरील फलंदाजाने या गाडीवर किंवा गाडीच्या पोस्टरवर चेंडू मारला, तर टाटा कंपनीकडून खास बक्षीस दिले जाते. जर एखादा फलंदाज अशी कामगिरी करू शकला, तर टाटा कंपनी त्या खेळाडूला नाही, तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पाच लाख रुपयांची मदत करते.

मोईन अली (Moeen Ali) राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चांगलाच चमकला. त्याने ५७ चेंडूत ९३ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १३ चौकार आणि ३ चौकार निघाले. सीएसकेच्या डावातील सातवे षटक राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) घेऊन आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर मोईनने एक चौकार मारला, जो ‘पंच’ गाडीच्या बोर्डवर जाऊन लागला. याच कारणास्तव काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला ५ लाख रुपयांची देणगी मिळाली.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मोईनने फक्त फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीत देखील योगदान दिले. त्याने टाकलेल्या चार षटकात २१ धावा खर्च करून १ विकेट घेतली. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने मर्यादित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १५१ धावा केल्या. राजस्थानने शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने संघासाठी सर्वाधिक ५९ धावांचे योगदान दिले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

Video: २२ वर्षांच्या गोलंदाजावरही अश्विनला नाही आली दया, गुडघ्यावर बसून मारला ९७ मीटरचा सिक्स

माहीची क्रेझ! चालू सामन्यादरम्यान चाहत्याची धोनीकडे धाव, मग अंपायरने केले असे काही

धोनी पुढल्यावर्षी खेळतोय, हे समजताच गावसकरांनी दिली कोट्यवधी थालाप्रेमींच्या मनातली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---