सोमवारी (२ मे) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आमना- सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या फलंदाजांवर केकेआरच्या गोलंदाजांनी वर्चस्व दिसले होते, पण अखेरच्या षटकांमध्ये शिमरॉन हेटमायरने महत्वपूर्ण धावा केल्या. हेटमायरच्या योगदानामुळे राजस्थान रॉयल्सला सन्मानजनक धावसंख्या उभी करता आली. हेटमायरने देखील एका महत्वाच्या यादीत पहिला क्रमांक गाठला.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार संजू सॅमसन या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता, पण १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याला शिवम मावीने त्याला रिंकू सिंगच्या हातात झेलबाद केले. सॅमसनने वैयक्तिक ५४ आणि संघाची धावसंख्या ११५ असताना विकेट गमावली. शेवटची तीन षटके राहिलेली असताना राजस्थान रॉयल्स १५० धावा करू शकेल, याविषयी कोणीच खात्री देऊ शकत नव्हते. परंतु त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या शिमरॉन हेटमायरमुळे (Shimron Hetmyer) संघाला १५२ धावांचा टपापा गाठता आला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हेटमायरने १३ चेंडू खेळले, ज्यामध्ये १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २७ धावा केल्या. या महत्वाच्या योगदानानंतर हेटमायर आयपीएल २०२२मध्ये अखेरच्या म्हणजेच शेवटच्या ४ षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. त्याने चालू हंगामात अखेरच्या षटकांमध्ये आतापर्यंत १८५ धावा केल्या आहेत. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कार्तिकने अखेरच्या षटकांमध्ये १५० धावा केल्या आहेत. १२९ धावांसह राहुल तेवतिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर एमएस धोनी आहे. धोनीने अखेरच्या षटकांमध्ये १११ धावा केल्या आहेत.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानचे सलामीवीर जोस बटलर (२२) आणि देवदत्त पडिक्कल (२) संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत, पण त्यानंतर आलेल्या संजू सॅसमनने सर्वाधिक ५४ धावा केल्या. त्यानंतर शिमरॉन हेटमायर (२७) आणि रविचंद्रन अश्विनने (६) नाबाद खेळी केली. या खेळाडूंच्या योगदानामुळे राजस्थानने ५ विकेट्सच्या नुकसानावर १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरकडून नितीश राणाने नाबाद सर्वाधिक ४८ धावा केल्या. तसेच, रिंकू सिंगने नाबाद ४२ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने ३४ धावांचे महत्वाचे योगदान दिले.
आयपीएल २०२२मध्ये अखेरच्या षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१८५ – शिमरॉन हेटमायर*
१५० – दिनेश कार्तिक
१२९ – राहुल तेवतिया
१११ – एमएस धोनी
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोलकाताविरुद्ध बटलरने केल्या फक्त २२ धावा, तरीही मोडला ‘किंग कोहली’चा भलामोठा विक्रम; टाका एक नजर