---Advertisement---

‘राजस्थान विरूद्ध पंजाब’ सामना आयपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, कारणंही आहे तसंच

On: सोमवार, सप्टेंबर 28, 2020 3:12 PM
---Advertisement---

रविवारी (२७ सप्टेंबर) शारजाह येथे खेळण्यात आलेला राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघातील सामना खूप रोमांचक झाला. या सामन्यात पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात केवळ २ विकेट्स गमावत २२३ धावांचा भलामोठा स्कोर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघ एकवेळ पराभूत होईल असे वाटत होते. पण त्यांनी १९.३ षटकापर्यंत ६ विकेट्स गमावत पंजाबचे लक्ष्य पूर्ण केले आणि हंगामातील सलग दूसरा विजय नोंदवला.

या सामन्यात दोन्ही संघातील बऱ्याच खेळाडूंनी एकाहून एक जबरदस्त कामगिरी केली. केवळ फलंदाजांविषयी बोलायचं झालं तर, पंजाब संघातील २ आणि राजस्थान संघातील ३ असे मिळून एकूण ५ फलंदाजांनी या सामन्यात ५० आणि त्यापेक्षा जास्त धावा कुटल्या आहेत.

आयपीएलच्या इतिहासात आजवर पहिल्यांदाच असे घडले आहे, जेव्हा एका सामन्यात एक-दोन नाही तर तब्बल ५ फलंदाजांनी ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर टी२० क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात तब्बल ५ फलंदाजांनी ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याची ही तिसरी वेळ आहे.

पंजाब संघाकडून फलंदाजी करताना मयंक अगरवालने सर्वाधिक १०६ धावा केल्या होत्या. त्याने केवळ ५० चेंडूत १० चौकार आणि ७ षटकार ठोकत हा कारनामा केला. तर पंजाबचा कर्णधार केएल राहुलने ५४ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. तसेच, राजस्थान संघाकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८५ धावा, राहुल तेवतियाने ३१ चेंडूत ५३ धावा आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथने २७ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-  

संजू सॅमसनने निवड समितीला दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाला अजून दहा वर्ष…

‘हैदराबादचा संघ कमकुवत, प्ले ऑफमध्ये नाही पोहचणार’; पाहा कोण म्हणतंय असं

आज बेंगलोर-मुंबई आमने-सामने; जाणून घ्या सामन्याबद्दल सविस्तर माहिती

ट्रेंडिंग लेख- 

असे २ भारतीय फलंदाज, ज्यांनी वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधीच आयपीएलमध्ये ठोकलेत सर्वाधिक अर्धशतके

जेसन होल्डर ४ वर्षांनी उतरणार आयपीएलच्या मैदानात, जाणून घ्या त्याच्याबद्दल ३ खास गोष्टी

असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---