जयपूर। आज(25 मार्च) आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा चौथा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होणार आहे. हा सामना सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर या राजस्थानच्या घरच्या मैदानावर होणार आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी राजस्थानने जोफ्रा आर्चर, जॉस बटलर, बेन स्टोक्स आणि स्टिव्ह स्मिथ या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच किंग्ज इलेव्हन पंजाबने निकोलास पूरन, ख्रिस गेल, मुजीब उर रेहमान आणि सॅम करन या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.
या सामन्यातून पंजाबकडून खेळणारा युवा क्रिकेटपटू सॅम करन हा आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. त्याने मागील काही महिन्यात त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यामुळे त्याची आयपीएलमध्ये कामगिरी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
त्याचबरोबर राजस्थानचा फलंदाज स्मिथ एक वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. मागीलवर्षी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथवर एक वर्षाची बंदी घातली होती. त्यामुळे बीसीसीआयनेही वॉर्नर आणि स्मिथला मागील मोसमात आयपीएल खेळण्यास नकार दिला होता.
असे आहेत 11 जणांचे संघ –
किंग्ज इलेव्हन पंजाब –
ख्रिस गेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), मयंक अगरवाल, सरफराज खान, निकोलस पूरन, मंदीप सिंग, सॅम करन, आर अश्विन (कर्णधार), मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, अंकित राजपूत.
राजस्थान रॉयल्स –
अजिंक्य रहाणे (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, कृष्णप्पा गॉथम, राहुल त्रिपाठी, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी.
महत्त्वाच्या बातम्या-
–युवराज सिंगने निवृत्तीबाबत केले मोठे भाष्य, पहा व्हिडिओ
–या कारणामुळे विराट कोहली होता चिंतेत…
–ऑलम्पिक इतिहासात पहिलांदाच उघडणार ‘इंडिया हाऊस’..






